S M L

नको असलेल्या कॉल्समुळे तुम्ही त्रस्त आहात का? तर सुरू करा 'ही' सर्विस

जाणून घ्या, कशी एक्टिवेट करायची ही सर्विस.

News18 Lokmat | Updated On: May 2, 2019 06:55 AM IST

नको असलेल्या कॉल्समुळे तुम्ही त्रस्त आहात का? तर सुरू करा 'ही' सर्विस

मुंबई, 1 मे : अनेकदा असं होतं की, तुम्ही अत्यंत महत्त्वाच्या कामात व्यस्त असता आणि त्याच वेळेस तुम्हाला एक फोन कॉल येतो. ज्यात समोरच्या व्यक्तीला क्रेडिट कार्ड किंवा गिफ्ट मिळवून देणाऱ्या स्किम्स संदर्भात तुम्हाला माहिती द्यायची असते. असा कॉल रिसिव्ह करताच तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाते. Unwanted call पासून सुटका मिळविण्यासाठी Vodafone ने आपल्या युजर्ससाठी विशेष सुविधा सुरू केली आहे.

डू नॉट डिस्टर्ब (DND) असं या सर्व्हिसचं नाव आहे. जी अॅक्टीवेट करताच तुम्हाला नको असलेल्या कॉलपासून सुटका मिळेल. तुम्ही तुमच्या वोडाफोन नंबर वरून एसएमएस किंवा फोन कॉलच्या माध्यमातून ही सेवा अॅक्टिवेट करू शकता. याशिवाय Vodafone च्या वेबसाइटवरसुद्धा ही सेवा सुरू केली जाऊ शकते.असं करा ऑनलाइन DND एक्टिवेट

जर तुम्ही वोडाफोन ग्राहक असाल आणि तुमच्या मोबाईल क्रमांकावर DND सेवा तुम्हाला एक्टिवेट करायची असेल तर सगळ्यात पहिले वोडाफोन वेबसाइट वरील डू नॉट डिस्टर्ब पेज वर जा. त्यानंतर तुमचं नाव, ईमेल आईडी ( जो वोडाफोनकडे तुम्ही रजिस्टर केला आहे)आणि वोडाफोन नंबर दिलेल्या जागी भरा. त्यानंतर Full DND खालीच्या Yes या बटनावर क्लिक करा. त्यानंतर सबमिट बटन वर क्लिक करा. यानंतर तुमच्या वोडाफोन क्रमांकावर DND सर्विस एक्टिवेशनची प्रक्रिया होईल.


Loading...

कॉल किंवा SMS द्वारे असं करा DND एक्टिवेट

ऑनलाइन व्यतिरिक्त तुम्ही फोन कॉल किंवा एसएमएसद्वारेसुद्धा 'डू नॉट डिस्टर्ब' सर्विस एक्टिवेट करू शकता. एसएमएसद्वारे ही सर्विस एक्टिवेट करण्यासाठी 'START 0' लिहून 1909 या क्रमांकावर तो मॅसेज पाठवा. यानंतर तुमच्या Vodafone क्रमांकावर डू नॉट डिस्टर्ब सर्विस एक्टिवेट होईल. आणि जर फोन कॉलच्या माध्यमातून तुम्हाला ही सर्विस एक्टिवेट करायची असेल तर 1909 वर कॉल करा. त्यानंतर निर्देशांचं पालन करत तुम्ही DND सेवा तुमच्या वोडाफोन नंबरवर एक्टिवेट करू शकता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 1, 2019 09:44 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close