येत्या दोन दिवसात राज्यभरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा अंदाज

येत्या दोन दिवसात राज्यभरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा अंदाज

धडाक्यात आगमन झालेला पाऊस गेल्या दोन दिवसांपासून गायब झालाय. आता हाच मान्सून येत्या दोन दिवसांत पुन्हा सक्रिय होणार असल्याचं हवामान खात्यानं सांगितलंय.

  • Share this:

16 जून : धडाक्यात आगमन झालेला पाऊस गेल्या दोन दिवसांपासून गायब झालाय. आता हाच मान्सून येत्या दोन दिवसांत पुन्हा सक्रिय होणार असल्याचं हवामान खात्यानं सांगितलंय. आतापर्यंत जून महिन्याच्या सरासरीपेक्षा सत्तावन्न टक्के पाऊस झालाय. पुढच्या चौदा दिवसांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल असा अंदाजही हवामान खात्यानं व्यक्त केलाय.

पुढील 2 ते दिवसांत महाराष्ट्रातील सर्व भागांत मुसळधार पावसाची शक्यता कुलाबा वेधशाळेने व्यक्त केली आहे. मोसमी वाऱ्यानी पुन्हा उसळी मारल्याने कोकण विभागात ( मुंबई )आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दरम्यान काल 15 पर्यंत जून महिन्यातील एकूण पावसापैकी 57 टक्के पाऊस पडला असून यापैकी मराठवाडयातील 8 जिल्ह्यात 70 टक्के पाऊस पडल्याची माहिती कुलाबा वेधशाळेचे मुख्य निदेशक के एस होसाळीकर यांनी IBN लोकमतशी बोलताना दिली. सध्या संपूर्ण महाराष्ट्राला मान्सूनने व्यापलाने पुढील 14 दिवसांत पाऊस जून महिन्यातील सरासरीपेक्षा अधिक पडेल अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

First published: June 16, 2017, 9:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading