मुंबईसह उपनगर, ठाणे परिसरात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू, सखल भागांत साचलं पाणी!

मुंबईमध्ये अनेक उपनगरांमध्ये दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. सतत पडणाऱ्या पावसामुळे वातावरणात गारवा पसरला आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 3, 2019 08:40 AM IST

मुंबईसह उपनगर, ठाणे परिसरात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू, सखल भागांत साचलं पाणी!

मुंबई, 03 सप्टेंबर : लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी वरुण राजाने राज्यभरात तुफान हजेरी लावली आहे. मुंबई, उपनगरांसह, ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसईला मुसळधार पावसानं झोडपलं आहे. सोमवारी दिवसभर मुसळधार पाऊस सुरू होता. सोमवारी रात्रीदेखील पावसाने उघडीप ने घेतल्यामुळे मुंबईच्या सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. अंधेरी, मिरारोड, वसई, ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबईत पावसाचा जोर जास्त होता. पुढील 48 तासांत मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मुंबईमध्ये अनेक उपनगरांमध्ये दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. सतत पडणाऱ्या पावसामुळे वातावरणात गारवा पसरला आहे. नवी मुंबईतदेखील मुसळधार पाऊस आहे. ऐरोली पुलाजवळ पावसामुळे पाणी साचलं आहे. वसई-विरारमध्ये पावसाने कालपासून जोरदार हजेरी लावली आहे. असाच पाऊस सुरू राहिल्यास वसई विरारमध्ये सखल भागात पाणी साचून गणेश मंडपात पाणी साचण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सावधान! राज्यात पुढील 48 तास मुसळधार पावसाचा इशारा

त्रीपासून मुंबईसह कोकण किनारपट्टीवर जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये मध्यरात्रीपासून दमदार हजेरी लावली. पुढील 48 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीवर वाऱ्यासह पाऊस असल्यानं मच्छीमारांना आणि दीड दिवसाच्या गणपतीचं विसर्जन करण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन प्रशासनाकडून देण्यात आलं आहे.

मंगळवारी दीड दिवसाच्या घरगुती गणपती बप्पाचं विसर्जन करण्यात येणार आहे. पहाटेपासून पावसाने बरसायला सुरुवात केली आहे. त्यामुळे गणपती विसर्जनादरम्यान पाऊसाचा जोर कमी व्हावा यासाठी भाविक गणरायाकडे प्रार्थना करत आहेत.

Loading...

इतर बातम्या - जिथे मोदी विकत होते चहा, त्या दुकानाबद्दल सरकारने घेतला खास निर्णय

मुंबई, कोकण, विदर्भ, छत्तीसगड, गोवा या भागांमध्ये पुढचे 48 तास मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबई शहराच्या तुलनेत उपनगरात रविवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे वातावरणात दिवसभर गारवा होता. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये अनेक भागांत पावसाने विश्रांती घेतल्याचं पाहायला मिळालं. मुंबईतही पावसाने विश्रांती घेतली आहे. पण पुढच्या काही दिवसांत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या भागांमध्ये पावसाचा जोर चांगला राहिल असं हवामान खात्यानं म्हटलं आहे.

इतर बातम्या -  'युती असल्याने इनकमिंगला मर्यादा पण लवकरच होणार मेगाभरती'

भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये सामान्य किंवा चांगला पाऊस झाला आहे. तर यंदा झालेल्या पावसामुळे मराठवाड्यामध्ये 24 टक्के पावसाची कमतरता आहे. जुलै महिन्याच्या शेवटी आणि ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या 10 दिवसांमध्ये महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली. त्यामुळे अनेक भागांमध्ये पुरांचा सामना करावा लागला. कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाल्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालं. संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं.

दरम्यान, ऑगस्ट महिन्यामध्ये झालेल्या पावसामुळे मध्य महाराष्ट्राला फायदा झाला असल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे. सगळी धरणं, तलावं आणि नद्या दुथडी भरून वाहत असल्यामुळे अनेक गावांचा पाणी प्रश्न सुटला आहे. या पावसामुळे मराठवाड्यातली पाणी कमतरता कमी होईल.

राज्य बँक घोटाळा: अजित पवारांवर अटकेची टांगती तलवार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 3, 2019 08:40 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...