Home /News /news /

Weather Alert: येत्या 5 दिवसात मुंबईसह पुण्यात पावसाचं धुमशान; हा जिल्हा वगळता पावसाची राज्यभर धुव्वाधार बॅटींग

Weather Alert: येत्या 5 दिवसात मुंबईसह पुण्यात पावसाचं धुमशान; हा जिल्हा वगळता पावसाची राज्यभर धुव्वाधार बॅटींग

आज राज्यभर पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

आज राज्यभर पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Weather Alert: पुढील पाच दिवस राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

    मुंबई, 05 सप्टेंबर: गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्यात मान्सूननं कमबॅक (Monsoon Comeback in Maharashtra) केलं आहे. त्यामुळे राज्यात सर्वत्र पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या आठवड्यापासून मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसानं जोरदार (heavy rainfall) हजेरी लावली आहेत. यानंतर आता राजस्थानपासून ते बंगलाच्या उपसागरापर्यंत हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होतं आहेत. त्यामुळे राज्यात मोसमी वाऱ्यांना गती मिळाली आहे. परिणामी पुढील पाच दिवस राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार हा जिल्हा वगळता राज्यात सर्वदूर जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्यानं आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, परभणी, हिंगोली आणि नांदेड या पाच जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (IMD give orange alert)जारी केला आहे. याठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या सरी कोसळणार आहेत. तर काही ठिकाणी तीव्र मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित महाराष्ट्राला मुंबई प्रादेशिक हवामान विभागानं येलो अलर्ट (yellow alert) दिला आहे. हेही वाचा-'या' 3 राज्यात कोरोनाची तिसरी लाट ठरू शकते प्राणघातक, ORFचं महत्त्वपूर्ण संशोधन आज कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर अधिक राहणार आहे. तसेच पुढील पाचही दिवस राज्यात सर्वदूर पावसाची धुव्वाधार बॅटींग पाहायला मिळणार आहे. दरम्यान पुण्यासह, सोलापूर, सांगली, नाशिक, जळगाव आणि संपूर्ण विदर्भात विजांचा कडकडाट अधिक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हेही वाचा-...तर आपण कोरोनाच्या संकटातून कधीच बाहेर पडणार नाही : मुख्यमंत्री मुंबईसह पुण्याला झोडपणार पाऊस गेल्या आठवड्यात मुंबईसह पुण्यानं रिमझिप आणि हलक्या पावसाच्या सरी झेलल्यानंतर आता या दोन्ही जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवस मुंबई आणि पुण्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. आज रविवारी आणि उद्या सोमवारी मुंबई आणि पुण्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर 7 आणि 8 सप्टेंबर रोजी दोन्ही जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर 9 सप्टेंबर रोजी मुंबईला येलो तर पुण्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Maharashtra, Mumbai, Weather forecast

    पुढील बातम्या