सावधान! मुंबईसह या जिल्ह्यांत 11 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस, काही गावांना पुराचा धोका

सावधान! मुंबईसह या जिल्ह्यांत 11 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस, काही गावांना पुराचा धोका

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यांमध्ये पुढचे काही दिवस मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पुराचा मोठा धोका निर्माण होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 09 सप्टेंबर : बाप्पाचं आगमन झाल्यापासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली. गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये आता पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. उजनी धरणाच्या पाणी विसर्गात आता मोठी वाढ करण्यात आली आहे. 16 मोर्यामधुन  70 हजार क्यूसेकने भीमा नदीत पाणी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पाण्याची पातळी 33 फुटांवर पोहोचली आहे. त्यामुळे एनडीआरएफच्या 3 टीम रविवारीच जिल्ह्यात दाखल झाल्यात. तर  कोल्हापुरातही पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे.

मुंबईसह उपनगरांत, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यामध्ये धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे पालघर जिल्ह्यातील नदी-नाल्यांना मोठा पूर आला आहे. तर सूर्या प्रकल्पातील धामणी आणि कवडास या दोन्ही धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. दमदार झालेल्या पावसामुळे धामणी धरण 100 टक्के भरलं आहे. त्यामुळे धामणी धरणाचे 5 दरवाजे दीड फुटानं उघडण्यात आले आहेत. धरणाच्या माध्यमातून सूर्या नदीमध्ये 8 हजार क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

11 सप्टेंबरपर्यंत या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होणार...

दरम्यान, भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यांमध्ये पुढचे काही दिवस मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पुराचा मोठा धोका निर्माण होणार आहे. मुंबईसह, पालघर, ठाणे, रायगड, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, सिंधूदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर, उस्मानाबादमध्ये 11 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

इतर बातम्या - अवधूत तटकरेंचा कार्यकर्त्यांसह सेनेत प्रवेश, राष्ट्रवादी सोडली कारण...!

गडचिरोली जिल्हयात भामरागड वगळता इतरत्र पुर ओसरला आहे. भामरागड अजुनही पुराच्या विळख्यात आहे. पर्लकोटा आणि पामुलगौतम नदीच्या पाण्याने चारही बाजुने भामरागडमध्ये प्रवेश केल्याने दोन दिवसापूर्वी 70 टक्के भामरागड गाव पाण्याखाली गेलं होतं. रविवारपर्यंत पुराचं पाणी काही प्रमाणात ओसरलं असलं तरी अजुनही पर्लकोटा नदीवरील मोठा पुल पाण्याखाली असल्याने भामरागडचा संपर्क तुटलेलाच आहे. 6000 नागरिकांना तहसिलदारांनी मध्यरात्री सुरक्षितस्थळी हलवून त्यांची राहण्याची आणि जेवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. अनेक घरामध्ये असलेलं पाणी तसंच असून भामरागडची ही पूरपरिस्थिती आणखी दोन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या - क्षणात तुटली साता जन्माची गाठ, पतीला उचलण्यासाठी हात देताच डंपरनं चिरडलं!

दापोलीमध्ये समुद्र किनाऱ्यावरील गावाला समुद्राच्या उधानाचा धोका निर्माण झाला आहे. समुद्राचं पाणी घरात घुसू लागल्याने गावकरी भयभीत झाले आहेत. रविवारपासून मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात आणि छतीसगड राज्यात जोरदार पाऊस पडला असल्याने संजय सरोवर इथलं पाणी वैनगंगा नदीत सोडले असल्याने नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. याचा फटका गोंदिया जिल्ह्यातील नदी काठावरील गावांना बसला आहे.

तिरोडा, धापेवाडा, गोंदिया मार्ग पुर्णताह बंद झाला आहे. तर तिरोडा तालुक्यातील चांदोरी, किंडगीपार, ढिवरटोली आणि गोदिंया तालुक्यातील धापेवाडा, मुरदाडा, अत्री, पिपरीया या गावात पाणी शिरलं असून पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. भिवंडीतही पावसाचा जोर वाढल्याने  गोदाम पट्ट्यात पाणी साचलं आहे.

इतर बातम्या - पुरोगामी महाराष्ट्रातील ऐतिहासिक घटना, 4 सुनांनी दिला सासूच्या पार्थिवाला खांदा!

विदर्भातील सर्वात मोठं समजलं जाणारं अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरण 100 टक्के भरलं आहे. या धरणाचे 3 दरवाजे उघडण्यात आलेत. या धरणातून दशलक्ष घनमीटर वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्ककतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, हा वेगवान पाण्याचा विसर्ग पाहण्यासाठी परिसरातील नागरिाकंनी मोठी गर्दी केली होती. गेल्यावर्षी या धरणात फक्त 44 टक्के पाणीसाठा होता. पण यंदा यावर्षी हे धरण 100 टक्के भरल्याने नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.

इतर बातम्या - अबब! हम दो हमारे...या लंकाबाई आहेत 21व्या वेळी गर्भवती

VIDEO : एकादशीला नासाने कसं सोडलं यान? ऐका भिडे गुरुजींचा तर्क

Published by: Renuka Dhaybar
First published: September 9, 2019, 7:54 PM IST
Tags:

ताज्या बातम्या