News18 Lokmat

बेळगावात सलग तिसऱ्या दिवशी गारपीट आणि जोरदार पाऊस

सलग तिसऱ्या दिवशी आजही सीमाभागात आणि बेळगाव शहरात पावसाने हजेरी लावली

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 5, 2017 05:11 PM IST

बेळगावात सलग तिसऱ्या दिवशी गारपीट आणि जोरदार पाऊस

संदीप राजगोळकर, बेळगाव

05 मे : सलग तिसऱ्या दिवशी आजही सीमाभागात आणि बेळगाव शहरात पावसाने हजेरी लावली. आज दुपारी 3 च्या सुमारास बेळगाव शहरात विजांच्या गडगडटासह जोरदार पाऊस झालाय.

शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात तुफान गारपीट ही झालीय, त्यामुळं आज बेळगाव शहरातले रस्ते बर्फमय आणि पांढरे शुभ्र झाल्याचं चित्र दिसत होतं. अचानक आलेल्या या पावसाने नागरिक आणि वाहनधारकांचे हाल झाले. पण हवेत गारवा निर्माण झाल्याने उकाड्याने त्रस्त झालेल्या बेलगावकराना सुखद गारवा अनुभवता आला.

आजच्या पावसाने बेळगाव शहरातील सखल भागात पाणी शिरले होते, अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडीही निर्माण झाली होती पण या पावसाने जिल्ह्यात कुठेही हानी झाल्याचं वृत्त नाहीय.

दरम्यान, पाऊस आणि गारपीटीमुळे पुणे बंगलोर या राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक संथ गतीने सुरू होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 5, 2017 05:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...