मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

VIDEO: ...आणि पुराच्या पाण्यातून जाणारा ट्रॅक्टर नदीत कोसळला, 2 जण बेपत्ता

VIDEO: ...आणि पुराच्या पाण्यातून जाणारा ट्रॅक्टर नदीत कोसळला, 2 जण बेपत्ता

मुसळधार पावसाने राज्याला पुन्हा एकदा झोडपून काढलं आहे. काही भागात तर एवढा पाऊस झाला की गावं आणि शेतं पाण्याखाली गेलीत.

मुसळधार पावसाने राज्याला पुन्हा एकदा झोडपून काढलं आहे. काही भागात तर एवढा पाऊस झाला की गावं आणि शेतं पाण्याखाली गेलीत.

मुसळधार पावसाने राज्याला पुन्हा एकदा झोडपून काढलं आहे. काही भागात तर एवढा पाऊस झाला की गावं आणि शेतं पाण्याखाली गेलीत.

  • Published by:  Kranti Kanetkar
कर्नाटक, 15 ऑक्टोबर : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटकात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक भागांमध्ये केवळ भातशेतीचच नुकसान नाही तर नागरिकांच्या घरात पाणी शिरलं आणि गाड्या वाहून गेल्या आहेत. रस्त्यांना नदीचं रुप आलं आहे तर कुठे पूल आणि रस्ते खचल्याचं वाहून गेल्याच्या घटना समोर येत आहे. भीषण पुरात कार अडकलेला व्हिडीओ समोर आल्यानंतर आता आणखीन एक काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ कर्नाटकातील असल्याची माहिती मिळाली आहे. दूध घेऊन जाणारा ट्रॅक्टर पुराचं पाणी असलेल्या पुलावरून जात असताना अचनक पाण्याचा वेग वाढला आणि पुलावरून नदीत वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा संपूर्ण प्रकार स्थानिकांनी कॅमेऱ्यात कैद केला असून त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हे वाचा-खतरनाक! पुरातून गाडी काढताना अचानक प्रवाह वाढला आणि जे घडलं तो VIDEO पाहून बसेल धक्का ही घटना कर्नाटकातील असल्याची माहिती मिळाली आहे. या ट्रॅकरमध्ये दोन तरुण होते. ट्रॅक्टरसोबत तेही बुडाले अद्याप या दोघांबद्दल कोणतीही माहिती मिळू शकली नाही. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात सोलापूर महामार्गावर एक कार आज वाहून गेली आहे. या घटनेतील चालकानं कारमधून बाहेर येण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच्या बद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही. मुसळधार पावसाने राज्याला पुन्हा एकदा झोडपून काढलं आहे. काही भागात तर एवढा पाऊस झाला की गावं आणि शेतं पाण्याखाली गेलीत. शहरांमधल्या रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं होतं. पावसाचा हा धोका टळला नसून महाराष्ट्रासाठी पुढचे 48 तास महत्त्वाचे असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. शेतकरी, मच्छिमार आणि नागरीकांनी काळजी घ्यावी असं आवाहनही हवामान विभागाने केलं आहे.
First published:

पुढील बातम्या