मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

'बालाजी वाचव रे'; तिरुपतीच्या रस्त्यांवर पाण्याचं रौद्र रूप, VIDEO चिंता वाढवणारे

'बालाजी वाचव रे'; तिरुपतीच्या रस्त्यांवर पाण्याचं रौद्र रूप, VIDEO चिंता वाढवणारे

रस्त्यावरही पाण्याच्या प्रवाहाचा भयंकर जोर आहे. या घटनेचा काही याशिवाय बालाजी मंदिरात पावसाचा मोठा परिणाम झाल्याचं सांगितलं जात आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

तिरूपती, 19 नोव्हेंबर : Tirumala Heavy Rain: तिरुपतीमध्ये ( Tirupati  News) गुरुवारपासून पावसाचा जोर (heavy rainfall) वाढला आहे. येथील अनेक भागांमध्ये पावसाचं रौद्र रूप पाहायला मिळालं. अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. काही भागात तर रस्त्यावरुन पाण्याचं रौद्र रूप पाहायला मिळालं.

मुसळधार पावसामुळे तिर्थयात्रेसाठी आलेल्या भक्तांमध्येही भीतीचं वातावरण आहे. कारण भूस्खलन झाल्यामुळे तिरूपतीच्या वरील व्यंकटेश्वर मंदिराच्या दिशेने जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. (heavy rainfall and Waterlogging on the roads of Tirupati VIDEO worrying)

तिरुमाला मंदिराच्या दिशेने जाणारा अलीपीरी फुटपाथ डोंगरांवरून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाने पूर्णपणे भरला आहे.

तिरुमाला तिरुपती देवस्थानम (टीटीडी), यांनी मुसळधार पावसामुळे अलीपीरी आणि श्रीवरिमेट्लूला दोन दिवसांसाठी बंद करण्याची घोषणा केली आहे. इतरच नाही तर पावसामुळे तिरुमालामध्ये वैकुंठम कतार परिसरावर परिणाम झाला आहे.

परिसरातील तहखान्यातदेखील पाणी घुसलं आहे.  टीटीडीचे अतिरिक्त कार्यकारी धर्मा रेड्डी यांच्या घरातही पाणी जमा झालं आहे.

आजही मुसळधार पावसाचा अलर्ट..

दुसरीकडे तामिळनाडूमध्ये राजधानी चेन्नईसह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. आंध्र प्रदेशातील चित्तूरमध्ये पावसामुळे पूरपरिस्थिती उद्भवली आहे.

हे ही वाचा-VIDEO : अख्खं तिरूपती शहर पाण्याखाली; 50 वर्षात पहिल्यांदाच भयावह पूर परिस्थिती

आंध्र प्रदेशच्या नेल्लूर, चित्तूर आणि कडपा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. पावसाचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

First published:

Tags: Andhra pradesh