News18 Lokmat

हतनूर धरणारे 12 दरवाज उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

तापी नदीवर अवलंबून असलेल्या दुष्काळी गावांतील पाणी योजनांना या पुराचा फायदा होणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 3, 2019 04:53 PM IST

हतनूर धरणारे 12 दरवाज उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

इम्तियाज अहमद, भुसावळ 3 जुलै : विदर्भ तसंच मध्य प्रदेशात तापी आणि पूर्णा नदीच्या उगम क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यानं जळगाव जिल्ह्यातील तापी नदीवरच्या हतनूर धरणाचे 12 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहेत. धरणाच्या 12 दरवाज्यांतून प्रति सेकंद 778 क्युसेक्स अर्थात 27 हजार क्युसेक्स एवढा पाण्याचा विसर्ग तापी नदी पात्रात सोडण्यात आलाय. धरणातून पाणी सोडण्यात आल्यानं खान्देशातील जळगावसह धुळे नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा जलसंपदा विभागाकडून देण्यात आलाय.

गेल्या काही दिवसांपासून विदर्भ तसच मध्य प्रदेशात पाऊस झाल्याने पूर्णा नदीच्या पाणीपातळीत अडीच मीटरने तर तापी नदीच्या पाणीपातळीत अर्ध्या मीटरने वाढ झालीय. जळगाव जिल्ह्यात दुष्काळ असल्यानं नदीपात्रात पाणी सोडल्यानं तापी नदीवर अवलंबून असलेल्या दुष्काळी गावांतील पाणी योजनांना या पुराचा फायदा होणार असल्याची माहिती हतनूरचे शाखा अभियंता एन.पी. महाजन यांनी दिलीय.

'वंचित'च्या अजब ऑफरवर भडकले काँग्रेसचे नेते, विजय वडेट्टीवार म्हणाले...

धामणा नदीच्या भिंतीला तडे, गावकरी धास्तावले

भोकरदन तालुक्यातील सेलूद येथे धामणा धरणाच्या (मध्यम प्रकल्पाला) भिंतीला तडे गेले असून भिंतीतून पाणी पाझरत आहे. विशेष म्हणजे धरणात 90 टक्के पाणी साठा आहे. गेल्या 5 वर्षांत प्रथमच धरणात एवढा पाणी साठा आहे. धरणाच्या भिंतीतून पाणी पाझरत असल्याने आजूबाजूच्या गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी धरणावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

Loading...

दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरणाफुटी घटनेची पुनरावृत्ती जालन्यात होऊ नये, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सांगितले आहे. धामना धरणाच्या भिंतीला ठिकठिकाणी तडे गेले असून भिंतीतून मोठ्या प्रमाणावर पाणी पाझरत आहे. गेल्या सहा दिवसांपासून भोकरदनसह परिसरात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झाला.

पेरणीसाठी पैसे नाहीत, करावं काय? या विवंचनेतून शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले

ज्यामुळे धामना धरणात 90 टक्के पाणी साठा झाला. गेल्या 5 वर्षांत प्रथमच धरणात एवढा मोठ्या प्रमाणावर पाणी साठले आहे. धरणाच्या भिंतीला ठिकठिकाणी तडे जाऊन पाणी पाझरत असल्याने परिसरातील गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. धरण अतिप्राचीन असून त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यानुसार देखभाल दुरुस्तीचा निर्णय घेतला जाईल. ग्रामस्थांनी घाबरण्याचे काही कारण नाही. खबरदारीचा इशारा म्हणून आपत्ती व्यवस्थापन पथकासह सेनेच्या एका तुकडीला इथे पाचारण करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 3, 2019 04:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...