• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: IMDच्या अंदाजामुळे भीती वाढली, पुढचे 4 दिवस राज्यात आणखी मुसळधार पाऊस
  • VIDEO: IMDच्या अंदाजामुळे भीती वाढली, पुढचे 4 दिवस राज्यात आणखी मुसळधार पाऊस

    News18 Lokmat | Published On: Aug 10, 2019 08:09 AM IST | Updated On: Aug 10, 2019 08:09 AM IST

    मुंबई, 10 ऑगस्ट : पुढचे 4 दिवस आणखी मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आता भीतीचं वातावरण आहे. यंदा उशिरा दाखल झालेल्या मान्सून राज्यभर पूरपरिस्थिती निर्माण केली आहे. कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पुरामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यात 9 ते 12 ऑगस्ट मान्सून सक्रिय राहणार आहे. 9 ऑगस्टला मध्य महाराष्ट्रात तुरळक, विदर्भात अनेक ठिकाणी अतिवृष्टी, मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडला. तर 10 ऑगस्टला कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होणार असल्याचं हवमान खात्यानं म्हटलं आहे. 11, 12 ऑगस्टला कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading