मुंबईत मुसळधार पाऊस, ठाणे आणि कोकणात अतिवृष्टीचा इशारा

मुंबईत मुसळधार पाऊस, ठाणे आणि कोकणात अतिवृष्टीचा इशारा

काल दुपारी 1 वाजून 46 मिनिटांनी समुद्रात 4.947 मीटर इतकी उंच भरतीची लाट होती.

  • Share this:

मुंबई, 16 जुलै : मुंबईत काल आणि आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. मात्र हा अतिवृष्टीचा इशारा एका स्तराने कमी झाल्याने आज मुंबईत मुसळधार ते तीव्र मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येतीय. दरम्यान पालघर आणि ठाणे जिल्ह्यासह रायगडसाठी मात्र मंगळवारपर्यंत अतिवृष्टीचा इशारा कायमच आहे.

कालही मुंबईत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता पण काल मुंबईत 47 मिमी इतकी समाधानकारक पावसाची नोंद झाली. दुसरीकडे मुंबईत मंगळवारपर्यंत सातत्याने पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. बुधवारनंतर मुंबईकरांना दिलासा मिळू शकतो.

LIVE : मागण्या पूर्ण करा अन्यथा मुख्यमंत्र्यांचं काय करायचं हे विठुराया आणि वारकरीच ठरवतील - राजू शेट्टी

तर दुसरीकडे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातही मुसळधार पाऊस कोसळतोय. कोल्हापूरातील पंचगंगा नदी दुथडी भरून वाहतेय. कोल्हापूर जिल्ह्यातील 65 बंधारे ओव्हर फ्लो झाले आहेत. तर सांगली जिल्ह्यातील वारणा आणि कृष्णा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.

वारणा धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून 3 हजार 492 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. त्यामुळे वारणा आणि कृष्णा नदी काटच्या गानवांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

पुण्यातलं खडकवासला धरण 91 टक्के भरलं आहे. त्यामुळे आज सकाळी खडकवासला धरणातून मुठा नदीत 2 हजार क्‍यूसेक पाणी सोड्‌ण्यात येणार आहे. जलसंपदा विभागाकडून ही माहिती देण्यात आली. दरम्यान खडकवासला धरणातील पाणीसाठा हा 55 .89 टक्‍के झालाय.

रेशम टिपनीस बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर

शहराला पुढील वर्षभर पुरेल एवढे हे पाणी आहे. त्यामुळं शहरातील पाणी टंचाईचं संकट टळलंय. खडकवासल्या पाठोपाठ पानशेत, वरसगा, आणि टेमघर धरणाच्या पाणीसाठयातही मोठी वाढ होत आहे.

दरम्यान, या पावसामुळे पर्यटन क्षेत्र मात्र आता धोकादायक झाली आहे. तुंगारेश्वर धबधब्यावर अडकलेल्या 50 पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे. रविवारी सकाळी तुंगारेश्वर धबधब्यावर जवळपास 50 पर्यटक अडकले होते. रविवार असल्यानं पर्यटकांची गर्दी वाढली होती. त्यात पावसाचा जोर वाढल्यानं धबधब्याच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाली. त्यामुळं 50 प्रवासी अडकले.

सुदैवानं पावसाचा जोर कमी झाल्यानं पाण्याची पातळी घटली आणि पर्यटकांना वाचवण्यात यश आलं. अन्यथा तुंगारेश्वर धबधब्यावर देखील चिंचोटी धबधब्यावर घडलेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती झाली असती.

हेही वाचा...

उद्धव ठाकरेंनी नाकारली तेलुगू देसमच्या नेत्यांना भेट, काय आहे कारण?

VIDEO : FACEBOOK LIVE च्या नादात सात जणांचा मृत्यू? अपघातापूर्वीचा व्हिडीओ व्हायरल

First published: July 16, 2018, 8:14 AM IST

ताज्या बातम्या