मुंबईत मुसळधार..'लाईफलाइन' मंदावली, 30-50 मिनिटे उशिरा धावत लोकल ट्रेन्स

दुपारनंतर पावसाचा जोर ओसरल्यानंतर आता रेल्वे ट्रॅकवरील पाणी ओसरले आहे. मध्य रेल्वेची वाहतूक अप आणि डाऊन लाईनवरील लोकल सेवा सुरु झाली आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 3, 2019 07:13 PM IST

मुंबईत मुसळधार..'लाईफलाइन' मंदावली,  30-50 मिनिटे उशिरा धावत लोकल ट्रेन्स

मुंबई, 3 ऑगस्ट- दुपारी 2 वाजेपासून ठाणे रेल्वे स्थानकावरुन मुंबईच्या दिशेने ठप्प झालेली रेल्वे सेवा आता पुन्हा सुरु झाली आहे. साधारण 3 ते 4 तास ही रेल्वे सेवा बंद होती.  मात्र, दुपारनंतर ठाणे ते कल्याण ते कसारा ते कर्जत अशी रेल्वे वाहतूक काही काही वेळाने सोडल्या जात होत्या. दुपारनंतर पावसाचा जोर ओसरल्यानंतर आता रेल्वे ट्रॅकवरील पाणी ओसरले आहे. मध्य रेल्वेची वाहतूक अप आणि डाऊन लाईनवरील लोकल सेवा सुरु झाली आहे.  गाड्या 30-50 मिनिटे उशीरानी धावत आहेत.

दरम्यान सतत पडत असलेल्या पावसामुळे शनिवारी दुपारी ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णत: ठप्प झाली होती. ठाणे ते मुलूंड रेल्वे रुळांवरुन प्रवाशांना पायी चालत जावे लागले. सतत पडत असलेल्या पावसामुळे मुलूंड, सायन, कुर्लादरम्यान रेल्वे रुळावर पाणी आल्याने या ठिकाणांहून रेल्वे चालवणे धोक्याचे होऊ शकते, यामुळे खबरदारी म्हणून काही काळ या रुळांवर लोकल सेवा बंद करण्यात आली होती. तर ठाणे ते कसारा आणि ठाणे ते कर्जत अशी लोकल सेवा मध्य रेल्वेने सुरु ठेवल्याने प्रवाशांना काही अशी दिलासा मिळाला आहे.

ठाणे रेल्वे स्थानकावरील प्लेट फॉर्म क्रमांक 4 वर कळव्याच्या दिशेचा रेल्वे रुळ अजून ही पाण्याखाली असल्याने या रुळांवरुन होणारी रेल्वे वाहतूक ही धिम्या गतीने केली जात आहे. पाऊस अजून पुढील काही तास मुसळधार पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहेय. असाच मुसळधार पाऊस पुढील काही तास पडला तर जनजीवन विस्कळीत होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी त्यांना आवश्यकच असेल तरच घराबाहेर पडावे, अशा सुचना शासनाने दिल्या आहेत.

सावधान! 7 ऑगस्टपर्यंत या भागात होणार मुसळधार पाऊस...

राज्यात सगळीकडे मुसळधार पाऊस सुरू आहे. पुढील आठवड्यातही पावसाचा जोर कायम राहाणार आहे. महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनारपट्टीच्या भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, गोवा या राज्यांत मुसळधार पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भागात पावसाचा जोर कायम असेल, अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई आणि परिसरात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी नद्यांच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे.

Loading...

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबई, कोकण आणि गोव्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल. विदर्भातही जोरदार पावसाचा अंदाज आहे. ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर नाशिक, सातारा आणि पुण्यातही जोरदार पाऊस पडेल. मराठवाड्यातही मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल.

दरम्यान, समुद्राच्या उधाणाचा जोरदार तडाखा सिंधुदुर्गातल्या देवबाग किनारपट्टीला बसला आहे देवबाग येथील ख्रिश्चनवाडी मोबार परिसरातली घरालगतची जमीन समुद्राने पोटात घेतली असून इथल्या वस्तीला धोका निर्माण झाला आहे. देवबागचा धूपप्रतिबंधक बंधाराही वाहून गेल्यामुळे कर्ली खाडीपात्राचं पाणी वस्तीत शिरले आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच इथल्या ग्रामस्थानी मागणी करूनही या बंधाऱ्याची डागडुजी केली गेली नसल्यामुळे ग्रामस्थ संतप्त आहेत.

VIDEO:मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत; पाहा महत्त्वाच्या 18 बातम्या

<iframe class="video-iframe-bg-color iframe-onload" onload="resizeIframe(this)" id="story-396651" scrolling="no" frameborder="0" width="100%" src="https://lokmat.news18.com/embed/videos/Mzk2NjUx/"></iframe>

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 3, 2019 06:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...