मुसळधार पावसाने मुंबई आजही तुंबली, या भागांत साचलं पाणी

मुसळधार पावसाने मुंबई आजही तुंबली, या भागांत साचलं पाणी

मुंबईत झालेल्या आजच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं असल्याची माहिती समोर येत आहे.

  • Share this:

मुंबई, 28 जुलै : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची गैरहजरी होती. पण श्रावण सुरु झाल्यापासून राज्यात पावसाचा पुन्हा कमबॅक झाला आहे. आज मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. रविवार आणि सोमवारी पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली होती. त्यानंतर आज पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. मुंबईत झालेल्या आजच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं असल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबईच्या अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. दादर हिंदमातामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. काल रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने विरारच्या सखल भागातदेखील पाणी साचलं असून विवा महाविद्यालयाच्या शेजारील सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं आहे. गेल्या अनेक वर्षापासून या सोसायट्यांमध्ये पाणी भरत आहे. मात्र, अजूनही कोणताही तोडगा न निघाल्याने रहिवाशांचे हाल होत आहेत.

नव्या सातबाऱ्यामध्ये होतील हे 11 मोठे बदल, राज्य शासनाला पाठवला प्रस्ताव

तिकडे भिवंडी परिसरातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शहर आणि ग्रामीण सखल भागात पाणी साचलं आहे तर शहरातील तीनबत्ती, कल्याण रोड, पद्मानगर सह विविध भागात पाणी साचलं आहे. त्यामुळे नागरिकांचे आणि चाकरमान्यांचे मोठे हाल होत आहेत.

दरम्यान, पुढच्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये सध्या ढगाळ वातावरण असून हलका पाऊस सुरू आहे. पण पुढच्या 24 तासांत पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता आहे.

पुण्यात एका रात्रीत वाढला कोरोनाचा मोठा आकडा, मुंबईलाही टाकलं मागे

गेल्या 24 तासात मुंबई व परिसरात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे. दिवसभर ढगाळ वातावरण राहिल. तर पुढच्या 24 ते 48 तासांत मुंबई आणि ठाण्यात मध्यम ते जोरदार पाऊसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढच्या 48 तासात मराठवाडा व इतर शहरांमध्ये मध्यम/जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

Weather Alert: महाराष्ट्रात होणार मुसळधार पाऊस, हवामान खात्याने दिला अलर्ट

मुंबई, ठाणे, पुण्यासह 1 ऑगस्टपासून कोकणात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या हिमालय पर्वत रांगांजवळ द्रोणीय स्थिती निर्माण झाल्यामुळे संपूर्ण उत्तर भारत, पंजाब, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, दिल्ली, हरियाणा, चंदीगड, मध्य प्रदेश, बिहार आणि ईशान्य भारतात 29 ते 31 जुलै दरम्यान, मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान खात्याने (IMD), ठाणे आणि मुंबईसह महाराष्ट्रातील विविध भागात मुसळधार पावसाचे संकेत देली असून अनेक ठिकाणी अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने सादर केलेल्या बुलेटिनमध्ये आज मध्य महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी किमान पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे, तर उद्या आणि आगामी काळात पावसाचा जोर वाढणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: July 28, 2020, 1:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading