मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

महाराष्ट्रात 'या' जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसानं कहर, गारवा वाढल्यामुळे कोरोनाची भीती वाढली

महाराष्ट्रात 'या' जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसानं कहर, गारवा वाढल्यामुळे कोरोनाची भीती वाढली

औरंगाबादसह संपूर्ण मराठवाड्यातील जिल्हे, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, महाबळेश्वर, खान्देशमधील जळगाव जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

औरंगाबादसह संपूर्ण मराठवाड्यातील जिल्हे, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, महाबळेश्वर, खान्देशमधील जळगाव जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

औरंगाबादसह संपूर्ण मराठवाड्यातील जिल्हे, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, महाबळेश्वर, खान्देशमधील जळगाव जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

  • Published by:  Manoj Khandekar
जालना, 19 मार्च : एकीकडे संपूर्ण देशाच कोरोनासारख्या आजारानं डोकं वर काढलं असताना महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त आहे. या कोरोनामुळे आधीच सामान्य नागरिकांची अवस्था झाली असताना आता अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहे. जालना शहरामध्ये पहाटेपासून अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. अचानक आलेल्या या पावसाने नागरिकांची चांगलीच धावपळ झाली तर शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकाचं नुकसान झालं आहे. राज्याच्या काही भागांवर पुढील चार दिवसात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. 17 ते 22 मार्चदरम्यान औरंगाबादसह संपूर्ण मराठवाड्यातील जिल्हे, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, महाबळेश्वर, खान्देशमधील जळगाव जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. दुसरीकडे, मध्य प्रदेशातील भोपाळ, बैतूल, होशंगाबाद आणि देवास यासारख्या काही प्रमुख ठिकाणी देखील पाऊस पडू शकतो. 'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर वाईट बातमी दरम्यान, महाराष्ट्रात बदलणारे हे वातावरण कोरोना व्हायरससाठी पोषक असल्यामुळे चिंता वाढली आहे. नाशिक, मुंबई, ठाणे, रत्नागिरी, पुणे, मालेगाव, कोल्हापूर हे जिल्हे वगळता उर्वरित बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. यामुळे कमाल तापमानात 6 अंशांपर्यंत घट होऊन वातावरणात गारवा जाणवेल. त्यामुळे सर्दी, डोकेदुखी, ताप, खोकला, दमा आदी रोगांचा उपद्रव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारतीय हवामान विभागाने दिलेली माहिती अशी की, हिंद महासागरावरील दाट ढगांचे आच्छादन, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील विविध भागावर तयार झालेला कमी हवेच्या दाबाचा पट्टा, चार दिशेकडून वाहत येणारे थंड, उष्ण, बाष्पयुक्त वारे, होणारे ढग व त्यात पृथ्वीवरून परावर्तित होणारी उष्णता यामुळे तापमानात अनपेक्षित चढउतार होत आहे. सापेक्ष आर्द्रता 100 टक्के, पोषक वातावरण तयार होते तेथे जोरदार पाऊस अन् गारपीट होत असते. महाराष्ट्राच्या या शहरांमध्ये अवकाळी पावसासह गारपीट काल महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये आणि शहरांमध्ये पावसाने हजेरी लावली. वाशिम शहरात झालेल्या गरपीटीनं हिंगोली नाका परिसरात कित्येक पोपट मरून पडल्याचीही बातमी आहे. गारपीटीचा पिकांना मोठा फटका बसला. हिंगोली जिल्ह्याचा सलग दोन दिवस वादळीवाऱ्यासह पाऊस आणि गारपीटनी झोडपले. हिंगोली, औंढा नागनाथ, कळमनुरी ,वसमत, सेनगाव तालुक्यात गारपीटसह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे काढणीला आलेल्या गहू आणि हरभराचे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे. सोलापूर शहरात मुसळधार अवकाळी पावसाने हजेरी लावली. बार्शी शहरात मुसळधार पाऊस झाला. उस्मानाबाद जिल्यात गारासह अवकाळी पाऊस झाला. कळंब तालुक्यातील शिराढोन, येरमाळासह गारांचा पाऊस झाला. नांदेडमध्येही नरसी नायगाव, देगलूर, मुखेड, लोहा, कंधारसह शहरात आवकाळी पाऊस झाला. बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई तालुक्यात गारा व वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. यात गारांमुळे ज्वारी, गहू हरभरा व फळ पिकांना मोठा फटका बसला आहे. काल माजलगाव, गेवराई, बीड, केज या तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अक्षरश: शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. परभणी, येवला तालुक्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस झला. पावसामुळे कांदा, गहू, हरभरासह इतर पिकांचे मोठे नुकसान झालं. पंधरा दिवसांत दुसऱ्यादा अवकाळी पावसाने झोडपल्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.
First published:

Tags: Maharashtra weather, Weather update

पुढील बातम्या