येत्या 3 दिवसात या भागांत मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

येत्या 3 दिवसात या भागांत मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

गोव्यात एकीकडे कोरोनाचा थैमान सुरू असताना गेली दोन दिवस गोव्यात मुसळधार पाऊस पडत आहे.

  • Share this:

गोवा, 17 जुलै : राज्यात कोरोनाचा धोका वाढतच आहे. अशात गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. मुंबईसह उपनगरात 15 जुलै आणि 16 जुलैला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. कोकण आणि गोवा परिसरात मुसळधार पाऊस झाला त्यानंतर आता येत्या 3 दिवसांत गोवा आणि दक्षिण कोकणात मुसळधार पाऊस होणार असल्याचा असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

गेल्या 24 तासात 84 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. गोव्यात एकीकडे कोरोनाचा थैमान सुरू असताना गेली दोन दिवस गोव्यात मुसळधार पाऊस पडत आहे. लॉकडाऊन सुरू असल्यानं जन-जीवनावर फारसा परिणाम झाला नसला तरी अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. येत्या 24 तासात गोव्यात आणि दक्षिण कोकणात मुसळधार पावसाची शक्यता गोवा वेधशाळेने व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रात या जिल्ह्याने जाहीर केला कडकडीत लॉकडाऊन, 7 दिवस सर्व सेवा बंद

गोव्यात केवळ दीड महिन्यातच मान्सूनने 70 टक्के पाऊस कव्हर केला आहे. हा पाऊस सरासरी पर्जन्यमानाच्या 35 टक्के जास्त आहे. गेल्या 24 तासात सर्वाधिक पाऊस सांगे इथं 90 मिलिमीटर तर कानकोण इथं 80 मिलिमीटर इतका पडला आहे. आतापर्यंत सर्वाधिक पाऊस पेडणं इथं 2326 मिलिमीटर नोंदला गेला आहे.

मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरेंच्या मंत्रालयात केला बदल, राजकीय वर्तुळात खळबळ

खरंतर, यंदा जून महिन्याची सरासरी पावसाने कधीच गाठली आहे. आता जुलै महिन्यातही पावसाकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने पाठ फिरवली होती पण आता दुसऱ्या आठवड्यामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. गेल्या दोन दिवसाच्या पावसामुळे वातावरणातही मोठा बदल झालेला पाहायला मिळतो. दिवसभर ढगाळ वातावरण असतं.

प्रेषित मोहम्मदांच्या सिनेमा बंदीवर प्रकाश आंबेडकर मुख्यंत्र्यांना भेटले

दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील सुरवाडे खुर्द परिसरात सोमवारी रात्री ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. या पावसामुळे सुरवाडे पंचक्रोशीतील सुमारे 40 ते 50 एकर शेती क्षेत्रावरील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. पावसाचा जोर इतका प्रचंड होता की, शेतांचे बांध देखील फुटून मातीसह अंकुरलेली पिकं वाहून गेली आहेत. कापूस, ज्वारी, बाजरी, सोयाबीन, उडीद-मूग पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: July 17, 2020, 7:18 PM IST

ताज्या बातम्या