मुंबई, 21 ऑगस्ट : राज्यात गेल्या तीन आठवड्यांपासून राज्यात पावसाचा जोर कायम आहे. आजही मुंबई, ठाणे, पालघरसह पुणे, विदर्भ, मराठवाडा भागाड मुसळधार पाऊस सुरू आहे. तर पुढील 3 तास मुंबई, रायगड, ठाणे, पालघर जिल्हात सर्वदूर पाऊस राहील तर काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे.
आज सकाळपासूनच मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे. तर आज दिवसभर पावसाचा जोर असाच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आज घराच्या बाहेर निघताना पावसाचा अंदाज नक्की घ्या आणि शक्य असल्यास आज प्रवास टाळा.
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, विदर्भ, मराठवाडा या भागात मान्सून अधिक सक्रीय होण्याची शक्यता असून कोकण किनारपट्टी, घाट माथा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही जिल्हात तर अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेन वर्तविला आहे.
Ganesh Chaturthi 2020 : गणेश चतुर्थीच्या पूजेचा मुहूर्त आणि महत्त्व
विदर्भात येत्या 24 तासांत मुसळधार पाऊस कायम राहणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर भागात अधून-मधून पासाच्या जोरदार सरी पडण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेन वर्तविली आहे. मुंबईत सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे काही महत्त्वाच्या आणि सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. तर येत्या 4-5 दिवसांत म्हणजेच 27 ते 28 तारखेपर्यंत गुजरात, महाराष्ट्र आणि गोव्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे.
सात मुलींच्या खांद्यावर आईची अंत्ययात्रा, हा फोटो खूप काही सांगून जातो!
दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, मराठवाड्यातही काही भागात पावसाचा जोर असणार असल्याचं सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 8 टक्के जास्त पाऊस झाला आहे. जुलै महिन्यात दडी मारलेल्या पावसाने ऑगस्टमध्ये मात्र जोरदार बँटिग सुरू केली. गेल्या पंधरा दिवसात महाराष्ट्रात 5 जिल्हे वगळता सरासरीपेक्षा 8 टक्के जास्त पावसाची नोंद झाली होती.
पाऊसमान चांगलं असंल तर सर्वसाधारणपणे ऑगस्ट महिन्यात राज्यातली बहुतांश धरणं भरून वाहू लागतात आणि सांगली, कोल्हापूरसारख्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होते. पण यंदा मात्र, जुलै महिन्यात वरूणराजाने मोठा ब्रेक घेतल्याने पुणे-मुंबईवर पाणीकपातीचं संकट दिसू लागलं होतं. पण ऑगस्ट महिना सुरू होताच मान्सूनने सर्वदूर बँटिग सुरू केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.