उत्तर भारतात थंडीचा कडाका तर दक्षिणेत उष्णतेची लाट

उत्तर भारतात थंडीचा कडाका तर दक्षिणेत उष्णतेची लाट

भारतात यावर्षी उत्तर आणि दक्षिणेमध्ये परस्परविरोधी हवामान पाहायला मिळालं. एकीकडे थंडीचा कडाका जाणवतोय तर दुसरीकडे उष्णतेची लाट आली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 6 मार्च : उत्तर भारतात थंडीचा कडाका कमी होऊ लागला असताना दक्षिण भारतात मात्र उष्णतेची लाट आली आहे.यावर्षी भारतात दोन्ही विरोधी स्वरूपाचं हवामान पाहायला मिळालं. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या सुरुवातीला उष्णतेच्या लाटेचे परिणाम पाहायला मिळाले.

तामिळनाडू, आंध्र प्रदेशची किनारपट्टी आणि तेलंगणातल्या रायलसीमा भागात दोन दिवस उष्णतेच्या लाटेचे परिणाम दिसून येतील, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला होता.

एखाद्या ठिकाणचं कमाल तापमान जर 40 डिग्रीच्या आत असेल तर त्याला उष्णतेची लाट असं म्हटलं जात नाही. पण सलग दोन दिवस आणि त्याहीपेक्षा अधिक काळ तापमान वर गेलं तर मात्र उष्णतेची लाट आली, असं मानतात. पहाडी भागात जर तापमान 30 अंशांच्या वर गेलं तरीही उष्णतेची लाट आली, असं म्हटलं जातं.


उत्तर प्रदेशात मोदींच्या अडचणी वाढणार, सपा-बसपा आघाडीत काँग्रेसचाही हात


उष्णतेच्या लाटेमुळे भारतात अनेकांचा जीव जाण्याच्या घटना घडल्या आहेत. 2016 मध्ये भारतात उष्णतेची लाट आली होती तेव्हा भारत सरकारने त्याला नैसर्गिक आपत्ती असं म्हटलं नव्हतं. पण 2016 च्या उष्णतेच्या लाटेच्या वेळी काय खबरदारी घ्यावी, याबद्द्ल भारतीय हवामान खात्याने सूचना जारी केल्या होत्या.

तामिळनाडूमधल्या धर्मापुरीमध्ये 6 मार्चला तापमान 40 डिग्रीच्या वर गेलं होतं. हे तापमान आत्तापर्यंतचं सगळ्यात जास्त तापमान आहे. तिरुचरापल्ली आणि मदुराई इथेही तापमानाने उच्चांक गाठला. तामिळनाडूप्रमाणेच आंध्र प्रदेशमघ्येही उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

दक्षिणेत उष्णतेची लाट असताना उत्तरेत मात्र थंडीचा कडाका आहे. जम्मू काश्मीरमध्ये हिमवर्षाव होतोय आणि पावसाळी हवामान आहे. पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा परिणाम उत्तरेतल्या हवामानावर होत असतो. यावर्षी या वाऱ्यांची तीव्रता वाढल्यामुळे उत्तरेतल्या तापमानाने नीचांक गाठला.

========================================================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 7, 2019 07:15 PM IST

ताज्या बातम्या