Home /News /news /

Health Tips : सतत पाणी पिण्याची सवय तुम्हाला 'या' मोठ्या रोगापासून वाचवू शकते

Health Tips : सतत पाणी पिण्याची सवय तुम्हाला 'या' मोठ्या रोगापासून वाचवू शकते

एका संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार दररोज योग्य प्रमाणात पाणी पित असाल आणि आपल्या शरीराला हायड्रेटेड ठेवत असाल तर हृदयविकाराचा धोका कमी होतो.

    दिल्ली, 16 सप्टेंबर : आपल्याला या धावपळीच्या जगात आरोग्य आणि आहारावर (Diet) लक्ष देणं कठीण जात आहे. अशा वेळी आपल्या जेवणाबाबतच्या वेळा सातत्याने बदलत जातात. त्यामुळे काही गंभीर आजार होण्याची शक्यता असते. हे आजार (disease) झाल्यावर आपल्याला वारंवार त्याचे उपचार करावे लागतात. परंतु आपण आपल्या एका चांगल्या सवयीमुळे या आजारांपासून आपल्या स्वत:चे संरक्षण करू शकतो. त्यामुळे काय करायला हवे याची आपण माहिती घेऊ या. एका संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार दररोज योग्य प्रमाणात पाणी पित असाल आणि आपल्या शरीराला हायड्रेटेड ठेवत असाल तर यामुळे संबंधित व्यक्तीला ह्रदयविकाराचा धोका कमी होतो, अशी माहिती नॅशनल इंन्स्टिट्युट अॉफ हेल्थ (National Institutes of Health) च्या संशोधनकर्त्यांनी (European Society of Cardiology Congress) समोर मांडली आहे. या रिपोर्टनुसार दररोज योग्य प्रमाणात पाणी पिणाऱ्या व्यक्तीला हार्ट अटॅकबरोबर आपल्या शरिरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठीही याचा फायदा होणार आहे. या संशोधनाद्वारे संशोधनकर्त्यांनी पाणी पिल्याने आपल्याला कोणकोणत्या आजाराचा धोका कमी होतो, याविषयी माहिती दिली आहे. दिवसभरातून एखादा व्यक्ती हा तुलनेत कमी पाणी पित असेल तर त्याच्या शरिरात सोडीयम कॉन्संट्रेशन वाढते. व त्याचा विपरित परिणाम हा त्याच्या शरिरावर होत असतो. तुम्हीही 'या' पद्धतीनं जेवण करत असाल तर व्हाल कर्जबाजारी; 5 गोष्टींची घ्या काळजी सतत योग्य प्रमाणात पाणी पिल्यावर त्यातून हार्ट अटॅकचा धोका कमी होऊ शकतो. हे संशोधन 44 ते 66 वर्ष वयोगटातील लोकांवर करण्यात आले असून या लोकांवर संशोधनकर्त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास केला आहे. या संशोधनाच्या निष्कर्षात संशोधकांनी हार्ट फेलियर आणि (Left Ventricular Hypertrophy) च्या दुसऱ्या काही गोष्टींनाही लक्षात घेतले आहे. त्यात ब्लड प्रेशर, किडनी फंक्शन, ब्लड कोलेस्ट्रॉल, ब्लड ग्लूकोज, बॉडी मास इंडेक्स स्मोकिंग स्टेटस या गोष्टींनाही विचारात घेतले गेले आहे.
    Published by:Atik Shaikh
    First published:

    Tags: Health, Health Tips, Heart Attack

    पुढील बातम्या