कुलभूषण जाधव प्रकरण : आजपासून आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी

कुलभूषण जाधव यांना हेरगिरीच्या आरोपाखाली अटक केल्यानंतर पाकिस्तान न्यायालयाने त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 18, 2019 11:22 AM IST

कुलभूषण जाधव प्रकरण : आजपासून आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी

द हेग, नेदरलँड, 18 फेब्रुवारी : पुलवामा दहशतवादी हल्ल्यामुळे भारत-पाक संबंध तणावपूर्ण आहेत. यातच पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारताचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणाची सुनावणी आजपासून सुरू होणार आहे. चार दिवस यावर आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी चालणार आहे.

पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्यावर हेरगिरीचा आरोप केला आहे. या प्रकरणात जाधव यांना मृत्यूदंडाची शिक्षाही सुनावण्यात आली आहे. याला भारताने 8 मे 2017 रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयात आव्हान दिलं आहे. 1963 ला झालेल्या व्हिएन्ना करारातील दुतावास संपर्क सुविधेच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे सांगत भारताने पाकिस्तानच्या निर्णयाविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती.

आंतरराष्ट्रीय न्यायलयाने जाधव यांच्या पाकने दिलेल्या शिक्षेला स्थगिती दिली होती. पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लाहून राहिले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न केला. त्यांचा मोस्ट फेवर्ड नेशन चा दर्जा काढून घेतला आहे. भारत सरकारमार्फत कुलभूषण जाधव यांची बाजू वकील हरीश साळवे मांडणार आहेत.

पाकिस्तानने दावा केला आहे की त्यांच्या सुरक्षादलाने कुलभूषण जाधव यांना मार्च 2016 मध्ये बलुचिस्तानमध्ये ताब्यात घेतले. ते इराणमार्गे पाकिस्तानात घुसल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. भारताने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. गेल्या वर्षी भारताने याबाबत आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती. पाकिस्तानने म्हटले होते की, कुलभूषण कोणी सामान्य नागरिक नाही. ते हेर असून विध्वंस करण्याच्या उद्देशाने पाकिस्तानात घुसले असल्याचा दावा केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 18, 2019 11:22 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...