रागाचा पारा नियंत्रणात ठेवयचा असले तर हे कराच तुम्ही

रागाचा पारा नियंत्रणात ठेवयचा असले तर हे कराच तुम्ही

ज्यांना जास्त राग येतो ते अनिद्रा, डोकंदुखी, उदासीनता आणि भूक न लागणं अशा अनेक समस्यामुळे त्रास असतात.

  • Share this:

मुंबई, 15 मे : मनासारखं नाही झालं किंवा एखाद्याने अपमानास्पद वागणुक दिली तर अनेकांना भयंकर राग येतो. अनेकदा रागाच्या भरात नाती-संमंध देखील तुटतात. राग येणं ही बाब स्वाभाविक असली तरी त्याचे भयंकर दुष्परिणाम तुमच्या आरोग्यावर होत असतात. ज्यांना जास्त राग येतो त्यांना अनिद्रा, डोकंदुखी, उदासीनता आणि भूक न लागणं अशा अनेक समस्या त्यांना त्रास देतात. म्हणून रागावर कसं नियंत्रण मिळवायचं याच्या टिप्स आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

राग मनात साठवून ठेवण्याएवजी तो व्यक्त करणं जास्त चांगलं असतं. असं केल्याने मनातला कडवटपणा निघून जातो आणि त्यानंतर तुमच्या मनात कोणत्याही प्रकारची नकारात्मकता शिल्लक राहत नाही. जेव्हा तुम्हाला जास्त राग येतो तेव्हा रनिंग किंवा कोणतंही एक्सरसाइज करा, असं तज्ज्ञ सांगतात. राग ही एक अशी उर्जा आहे जी तुमच्या शरीराला हानिकारक ठरते. ही उर्जा जर तुम्ही सकारात्मक दिशेने वापरली तर ती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

सावधान, WhatsApp युजर्ससाठी मोठा धोका, कोणीही पाहू शकतं तुमचं चॅट

कोणताही विचार न करता रागाच्या भरात बोलल्याने अनेकांची मनं दुखवली जातात. त्यामुळे रागाच्या भरात बोलण्याआधी त्याचे परिणाम काय होतील याचा शंभरदा आधी विचार करा. प्रत्येकवेळस राग व्यक्त करणं हे गरजेचं नसतं. नाती तुटण्यासाठी ही बाब कारणीभूत ठरू शकते. म्हणून जेव्हा राग आला असेल तेव्हा मनातल्या मनात 10 पासूप 1 पर्यंत उलट्या क्रमाने मोजणी करा.

रागामुळे अनेकांच्या हार्ट बीट वाढून जातात. अशा वेळेस श्वासावर लक्ष केंद्रीत करून रागावर नियंत्रण मिळण्याचा प्रयत्न करावा. असं केल्याने तुमचा राग केव्हा शांत झाला हे तुम्हालासुद्धा कळणार नाही. जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा त्याचं कारण शोधण्याचा प्रयत्न करा. झोप पूर्ण न होणं हे सुद्धा तुमच्या रागाचं मूळ कारण असू शकतं. त्यामुळे पूर्ण झोप घेणं हेसुद्धा आवश्यक आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 15, 2019 06:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading