मुंबई, 5 मे : जेवण झाल्यानंतर अनेकांना सतत ढेकर येतात. तुम्हीही या त्रासामुळे हैराण आहात का? तर मग याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. कारण आरोग्याच्या दृष्टीनं वारंवार ढेकर येणं एखाद्या समस्येचं लक्षण मानलं जातं. यामुळे अॅसिडिटी आणि अनेक गंभीर समस्या उद्भवतात. या समस्येवर वेळीच उपाय करा.
सतत जंक फूड किंवा कोबी, वाटाणे या भाज्यांमुळे गॅसेसच्या समस्या निर्माण होतात आणि त्यामुळे जास्त ढेकर येतात. तणावामुळेसुद्धा अनेकदा काही लोक प्रमाणापेक्षा जास्त जेवण करतात. त्यामुळे अन्नपदार्थांचंही व्यवस्थित पचन होत नाही आणि सतत ढेकर येतात.
अल्सरचा त्रास असणाऱ्या रुग्णानांही सतत ढेकर येते. अशा परिस्थितीमध्ये छातीमध्ये जळजळ होते. या समस्येपासून कायमची सुटका व्हावी असं वाटत असेल तर जेवताना एकही शब्द न बोलता प्रत्येक घास योग्य प्रकारे चावून खावा. जास्तीत जास्त पाणी प्यावे. गॅसेसच्या समस्या निर्माण होतील, असे अन्नपदार्थ खाणे टाळावेत. लिंबू पाणी प्यावे. यामुळे ढेकर येणं काही प्रमाणात बंद होतील. पचन तसंच पपई आणि दही हे सुद्धा या समस्येवर गुणकारी आहेत.
वाचा अन्य बातम्या
VIDEO: मी संन्यासी आहे, साध्वी प्रज्ञासिंह यांचं निवडणूक आयोगाला उत्तर
VIDEO: पुण्यात ड्रेनेजची पाईपलाईन फुटली, रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम
गडचिरोली माओवादी हल्ल्यात मिलिंद तेलतुंबडेंचा हात? 18 जणांविरोधात FIR
VIDEO: 'त्या' बोल्ड दृश्याबद्दल प्रिया बापटनं अखेर मौन सोडलं