Home /News /news /

आवळ्याचा रस पिताना ही काळजी घेता का? अन्यथा होतील दुष्परिणाम

आवळ्याचा रस पिताना ही काळजी घेता का? अन्यथा होतील दुष्परिणाम


आवळा हे एक सुपर फूट आहे.

आवळा हे एक सुपर फूट आहे.

शरीरासाठी आवळा (Amla) एक वरदान आहे. आवला रस पिण्याचे फायदे आहेत, पण, योग्य वेळी आणि प्रमाणात घेतलं नाही तर त्याचे दुष्परिमाही (Side Effects) होतात.

    नवी दिल्ली,04 जुलै: प्रत्येकाच्या शरीराला प्रोटीन (Protein),व्हिटॅमीन्स(Vitamin),मिनरल्स(Minerals),कॅल्शियम(Calcium),कार्बोहायड्रेट यासह इतर अनेक घटकांची आवश्यकता असते. काही व्हिटॅमीन्स सप्लीमेंटच्या माध्यमातून घेता येतात. मात्र, नैसर्गिक स्रोतांच्या माध्यमातून आपण त्यांचं सेवन केलं तर जास्त फायदा मिळतो.  व्हिटॅमीन सीचा सगळ्यात मोठा स्त्रोत आहे आवळा(Alma). आवळा (Indian Gooseberry) हे एक सुपर फूट (Super food)आहे असं आपण म्हणू शकतो. आवळा शरीरातल्या अनेक समस्या दूर कतो. या सोबतच केसांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आवळ्याचा उपयोग करता येतो. याबरोबर आवळ्याच रस प्यायल्याने त्वचा निरोगी राहते. पण, आवळ्याचा रस नेमकं कधी प्यावा हेच कळत नाही. केव्हा घ्यावा आवळा रस सकाळी रिकाम्या पोटाने केवळ 10 मिलीग्रॅम आवळा सर घ्यावा. सकाळी फक्त 10 ते 20 मिलीग्रॅम आवळा रस पिणंच चांगलं असतं. आवळ्याच रस जास्त घेतल्याने आरोग्याला हानिकारक ठरू शकतो. शिवाय 10 मिलीग्रॅम 2 वेळा घेऊ शकता. कोमट पाण्यात 2 ते 3 चमचे आवळ्याचा सर घ्यावा. म्हणजे रिकाम्या पोटी घेतला तरी साईडइफेक्ट होणार नाहीत. (महिलांनो कौटुंबिक हिंसेपासून सुरक्षेसाठी जाणून घ्या कायदेशीर अधिकार) आवळ्याची पेस्ट करून त्यात 2 चमचे मध मिसळा. सकाळी आणि संध्याकाळी घ्या. यामुळे सर्दी होणार नाही. जर ती असेल तर ते ठीक होईल. 6 ते 7 दिवस रिकाम्या पोटी फक्त 1 चमचा आवळा रस प्या. त्यामुळे पोटातील जंतूंचा नाश होईल आणि पोट साफ होईल. डायबेटिज असलेल्या लोकांनी आवळ्याचा रस घ्यावा. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात येते. (चेहरा Bleach करताय? होणारी जळजळ थांबवायची असेल तर अशाप्रकारे घ्या काळजी) लघवीला जळजळ होत असेल तर, रिकाच्या पोटी आवळा आणि मध यांचं मिश्रण प्यावं आराम मिळेल. आवळा खोकल्यासाठीही फायदेशीर आहे. आवळ्याचा मुरंबा दुधाबरोब घेतल्यास. खोकल्यापासून आराम मिळतो. पांढरा केस काळे करण्यासाठी आवळा प्रभावी आहे. नारळ तेलात 2 ते 3 आवळे किसून रात्रभर भिजवा. सकाळी या तेलाची मॉलिश करा. केस काळे होतील आणि मजबूतही बनतील.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health Tips, Lifestyle

    पुढील बातम्या