Stress दूर पळून जाईल; Positivity वाढविण्यासाठी 'या' रोपांचा करा उपयोग!

Stress दूर पळून जाईल; Positivity वाढविण्यासाठी 'या' रोपांचा करा उपयोग!

लॉकडाऊन आणि कोरोनाच्या महासाथीमुळे अनेकांना डिप्रेशनचा (Depression) त्रास होत आहे. मात्र हा त्रास होऊ नये यासाठी काही छोटे पर्यात मोठं काम करू शकतात.

  • Share this:

दिल्ली, 3 मे : कोरोना काळात (Corona Period) घरात रहा सुरक्षित राहा, हेच सगळ्यांना सांगण्यात येत आहे. काही भागात लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्यात आला आहे. हात स्वच्छ धुवा, सोशल डिस्टंन्सिंग पाळा, घरातच राहा आणि मास्क लावा... अशा सुचना करण्यात येत आहेत. लॉकडाउनमुळे घराबाहेर पडणं बंद झालं आहे. त्यामुळे एकटेपणा जाणवायला लागला आहे. काही जणांना डिप्रेशनचा (Depression) त्रास होत आहे. काही जणांची सहनशक्ती कमी झाली आहे. काही घरांमध्ये भांडण वाढायला लागली आहेत. अशात मानसिक स्थिती चांगली ठेवायची असेल तर, कोणत्या ना कोणत्या कामात स्वत:ला व्यग्र ठेवायला हवं. त्यामुळे एकटेपणाच्या भानवेतून बाहेर येऊन पॉजिटीव्हीटी (Positivity) वाढेल.

डिप्रेशनमधून बाहेर येण्यासाठी प्रत्येक प्रकारच्या निगेटिव्ह विचारांमधून बाहेर येण्याचा प्रयत्न करायला हवा. सकारात्मक विचार आणि पॉजिटिव्ह एनर्जीसाठी घरात सकारात्मक विचार ठेवण्याचा प्रयत्न करा. गप्पा मारा, छोटेछोटे गेम खेळा. पॉजिटिव्ह एनर्जी मिळवण्यासाठी काही रोपांचाही उपयोग होऊ शकतो. काह औषधी रोपं (Herbs) फूलं (Flowers) घरात ठेवल्याने सकारात्मक उर्जा मिळेल आणि कोरोना काळात मनावर येणारा ताण कमी होईल.

(PHOTOS: Work From Home करताना कंबरदुखीचा त्रास होतोय? 'हे' 7 उपाय ठरतील फायदेशीर)

तुळस

आपल्या देशात तुळशीला पुजनीय मानलं जातं. तुळशीमध्ये औषधी गुणधर्म असतात त्यामुळे तिचा वापर आयुर्वेदात उपयाचारासाठी केला जातो. तुळस लावल्याने सुख आणि शांती घरात नांदते. तुळस सकारात्मक उर्जेचा स्त्रोत आहे. तुळशीची पाने खाल्ल्याने अनेक आजारात आराम मिळतो. तर, मनावरचा ताणही कमी होतो.

(OMG! नागपुरच्या लोपमुद्रा राऊतचा बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाज; PHOTOS ची तुफान चर्चा)

गुलाब

गुलावाच्या अनेक प्रजाती आहेत. घरात गुलाब लावताना त्यांच्या फुलांचं रंगरूप पाहण्यापेक्षा त्यांचा गुणधर्म पहावा. गावठी गुलाबाचे अनेक फायदे आहेत. गुलाबाचा सुगंध आपल्याला आकर्षित करतो आणि स्त्रियांना देखील केसांमध्ये घालयला आवडतो. गुलाबाचे फूल शांतता, प्रेम आणि सकारात्मक वातावरणाचे प्रतीक आहे. हे पवित्र फूल आपल्या सभोवतालची नकारात्मक उर्जा काढून टाकते आणि आपल्या जीवनातील तणाव दूर करते. म्हणूनच शुभ कार्यात गुलाबाची फुले वापरली जातात.

(कोरोना पॉझिटिव्ह अभिनेत्रीनं मागितली मदत; मनोज वाजपेयीनं पोहोचवलं जेवण)

मनी प्लांट

मनी प्लँट कुठेही ठेवता येतो. बेडरुम, बाल्कनी, बाथरुम, ड्रॉईंग रूम आणि गार्डनमध्ये मिनी प्लॅट ठेवता येतो. ज्यांना हिरवळ आवडते असे लोक तर किचनमध्येही मनी प्लॅट लावतात. मनी प्लॅँटने घरात सकारात्मक उर्जा निर्माण होते. मनी प्लॅंँटची जास्त काळजी घ्यावी लागत नाही.

जॅस्मीन

चमेलीच्या फुलांचा सुवास सगळ्यांनाच आकर्षित करतो. सर्वांनाच हा सुवास खुप आवडतो. जगात अनेक देशांमध्ये चमेलीच्या फुलांना पवित्र मानलं जातं. आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी, मैत्री आणि प्रेम वाढवण्यासाठी चमेलीच्या फुलांना महत्व आहे. या फुलांना सुंदर वास असल्यामुळे ऑईल, बॉडीवॉश, साबण यात त्याचा वापर होतो. याशिवाय या फुलांचा सुवास उदबत्ती आणि मेणबत्ती यातही वापरला जातो. याच्या सुवासाने रात्री चांगली झोप येते.

(अभिनेत्रीचं पाचव्यांदा ब्रेकअप; शेवटी एक्स बॉयफ्रेंडसोबतच पुन्हा थाटला संसार)

रोजमेरी

रोजमेरीचं रोप घरात ठेवल्यास वातावरण चांगलं राहतं. राग कमी करण्यासाठीही, डिप्रेशन, एकटेपणा कमी करण्यासाठीही याचा उपयोग होऊ शकतो. रोजमेरीचे रोप घराच्या वर्हांड्यात, बागेत लाऊ शकता किंवा घरातही लावता येतं.

Published by: News18 Desk
First published: May 3, 2021, 7:29 AM IST

ताज्या बातम्या