मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

हिवाळ्यात डिंकाचे लाडू का खावेत? जाणून घ्या कारण

हिवाळ्यात डिंकाचे लाडू का खावेत? जाणून घ्या कारण

रोज एक डिंकाचा लाडू खाण्याचे 10 फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

रोज एक डिंकाचा लाडू खाण्याचे 10 फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

रोज एक डिंकाचा लाडू खाण्याचे 10 फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई, 02 जानेवारी: महाराष्ट्रात सगळीकडे चांगलीच थंडी पडायला लागली आहे. थंडी आणि डिंकाचे लाडू हे समीकरण ठरलेलं असतं. भारतात हिवाळ्यात डिंकाचे लाडू बनवले जातात. डिंक, गव्हाचं पीठ, तुप,खोबरं, गुळ आणि भरपुर सुका मेवा वापरून हे लाडू बनवले जातात. थंडीच्या दिवसांमध्ये शरीरात ऊर्जा आणि उष्णता निर्माण करण्याचं काम डिंक करतं. हे लाडू स्त्रीच्या गरोदरपणातही खायला दिले जातात.

1.डिंकामुळे थंडीत शरीराला ऊर्जा आणि उब मिळते. शरीरात ताकद येण्यास मदत होते.

2. बाळ-बाळंतिणीसाठी डिंकाचे लाडू अतिशय उपयोगी असतात. यामुळे शरीराला मजबुती येते. बाळंतिणीला दूध येण्यासाठी हे लाडू दिले जातात.

3.डिंकात भरपुर पौष्टिक मूल्य असतात आणि ते आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

4.पाठीच्या हाडाला डिंक मजबुत बनवतं.त्यामुळे लहान मुलांना डब्याला किंवा सकाळी दुधासोबत नाश्त्याला हे लाडू देता येतील.

5.डिंकाची चिक्कीसुध्दा खायला चांगली असते.

हेही वाचा-जाणून घ्या मेष राशीसाठी करिअर आणि आर्थिकदृष्ट्या कसं असेल नववर्ष

6. डिंकात जास्त फॅट्स आणि कॅलरिज् असतात. त्यामुळे अशक्तपणा कमी होतो.

7. डिंकाचे लाडू उष्ण असतात, म्हणून जपून खावेत.

8. दररोज एक ते दोन डिंकाच्या लाडूंचे सेवन केल्यास बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते. परंतु दोनपेक्षा जास्त गम लाडू सेवन केल्याने पोट खराब होऊ शकते. कारण जास्त खाल्ल्याने पचन करणे कठीण होते.

9.डिंकाचे लाडू आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात आणि हे लाडू खाल्ल्याने शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढते.

10. रोग प्रतिकारशक्ती क्षमता वाढल्यामुळे आपण सहसा आजारी पडणार नाही. मणक्यांसाठी देखील प्रभावी मानले जातात.

हेही वाचा-सावधान! सतत हेडफोन्सवर गाणी ऐकल्यानं होऊ शकतात गंभीर आजार

First published:

Tags: Lifestyle