थंडीत आवळा खाण्याचे 10 गुणकारी फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

थंडीत आवळा खाण्याचे 10 गुणकारी फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

पित्त, डोकेदुखी आणि आतड्यांचा आजार दूर करण्यासाठी रोज एक आवळा खायलाच हवा.

  • Share this:

मुंबई: थंडीच्या मौसमात आवळा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो. आकारानं लहान असलेला गुणकारी आवळा हा चवीला तुरट आंबट असला तरी त्याचे शरीराला होणारे फायदे मात्र अनेक आहेत. आवळ्यापासून मोरावळा, पेठा, सुपारी, सरबत, लोणचं, आवळा पावडर, आवळा कॅण्डी असे अनेक पदार्थ तयार केले जातात. आवळ्याला बहुगुणी असंही म्हटलं जातं अगदी पित्तापासून ते हाडांच्या मजबुतीपर्यंत विविध पद्धतीनं आवळ्याचे शरीरासाठी फायदे होतात. आवळा तुम्हाला निरोगी ठेऊ शकतो. आवळ्याच्या सेवनाने मेंदू पुष्ट, श्वासरोग दूर व हृदय मजबूत होते. नेत्रदृष्टी आणि आतड्यांची कार्यशक्तीत वृद्धी होते.

आवळ्यामध्ये सी व्हिटॅमिन असतं. त्यामुळे शरीरातील व्हिटॅमिन आणि आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी रोज आवळ्याचं सेवन करणं आवश्यक आहे. तुम्ही आवळा पावडर, मोरावळा यासारखे पदार्थ तयार करून तुम्ही सहा महिने आवळा रोज सकाळी खाऊ शकता. आवळा हा उपाशी पोटी खाल्ला तर अधिक लाभदायी असतो.

आवळा खाण्याचे हे 10 फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

1. आवळ्यातील व्हिटॅमिन सी त्वचेवरील मुरूम, फोड घालवण्यास मदत करते. रोज आवळा खाल्यानं त्वजा तजेल राहाते.

2. गर्भवती महिलांनी आवळा खाल्ल्यास बाळ-आईचे उत्तम पोषण होते.

3.मोरावळा खाल्ल्यानं पोट साफ राहातं, पित्ताचा त्रास होतं नाही. अशक्तपणा दूर होतो. मधुमेह असणाऱ्या रूग्णांनी नियमित मोरावळा खावा.

4.हिरड्यांमधून रक्त येणे, तोंड येणे यांसारख्या आजारांवर आवळा उत्तम औषध. त्वचेचे आजार उद्भवत नाहीत.

5. आवळ्यामुळे स्मरणशक्ती आणि बुद्धी चांगली राहण्यास मदत होते.

6. मुलायम आणि लांब केसांसाठी आवळ्याची पावडर तेलात उकळून लावावी. रोज एका आवळ्याचं सेवन करायला हवं.

7. तुम्हाला पित्ताचा त्रास असेल तर रोज एक आवळा कॅण्डी, आवळा सुपारी तुम्ही खाऊ शकता. रोज सकाळी आवळा सरबर घेतलं तरीही आराम मिळतो.

8. हाडांच्या मजबुतीसाठी आणि पोटाच्या विकारांसाठी तुम्ही कोमट पाण्यात आवळा पावडर घालून रोज सकाळी घेऊ शकता. याशिवाय आवळा पावडर भिजवून ती केसांनाही लावली जाते.

9. लहान मुलांना मुरांबा किंवा मोरावळा स्वरूपात पोळीसोबत खाण्यासाठी आवळा दिल्यास मुलंही आवळा खातात.

10. रोज आवळ्याची एक फोड खायला हवी. यामुळे तुम्ही निरोगी राहण्यास मदत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 19, 2019 01:21 PM IST

ताज्या बातम्या