लोकप्रिय 'दीक्षित डाएट'च्या विरोधात डाएट प्लॅन देतेय 'ही' न्यूट्रिशनिस्ट

लोकप्रिय 'दीक्षित डाएट'च्या विरोधात डाएट प्लॅन देतेय 'ही' न्यूट्रिशनिस्ट

आहारतज्ज्ञ असलेल्या 'या' सेलिब्रेटीने सांगितल्या 10 सोप्या फिटनेस टिप्स.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 मे  : आयुष्यात केलेले कोणतेच बदल हे कायम टिकून राहत नाहीत. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत फिट राहणं अत्यंत महत्त्वाचं. सेलिब्रिटी आणि न्यूट्रिशनिस्ट पूजा मखिजा ही 'डाएट'च्या विरोधात असून, तिने फिट राहण्यासाठी डाएट प्लॅन दिला आहे.

कामाच्या अतिताणानं Burn Out झालात? ही थकावट नव्हे तर आजारच - WHO ने घेतली दखल

फिट आणि निरोगी राहण्यासाठी तुम्हाला कायमस्वरूपी बदल घडवून आणावे लागतील. त्यासाठी लहान-लहान गोष्टींवरसुद्धा तुम्ही लक्ष केंद्रीत करायला हवं असं पूजा सांगते. या लहान-सहान गोष्टीच तुमच्या जीवनात अमुलाग्र बदल घडवून आणू शकतात. खाण्या-पिण्याच्या सवयीवर लक्ष ठेऊन, शरीराला पोषक तत्त्व देणाऱ्या घटकांचं सेवन तुम्ही करायला हवं. कमी खाणं हा त्यावर उपाय नाही, तर योग्य आणि उत्त्म आहार घेणं महत्त्वाचं असल्याचं पूजा सांगते. येत्या जूनमध्ये 'Healthy Binge'च्या माध्यमातून पूजा मखिजा 'हेल्दी डाएट'चा संदेश देणार आहे. आहारतज्ज्ञ असलेली पूजा सद्या तिच्या पुस्तकावर काम करत असून, त्यात 'काय खावं आणि काय खाऊ नये' याची माहिती ती देणार आहे.

उंची वाढवण्यासाठी 'हे' करा, नक्की होईल फायदा

तिने काही सोप्या फिटनेस टिप्स सांगितल्या आहेत -

Loading...

1 - सकाळ आणि सायंकाळच्या दोन्ही जेवणात मोठं अंतर ठेऊ नका.

2 - प्रत्येक दोन तासानंतर थोडं-थोड काहीतरी खा

3 - जास्त शारीरिक श्रम करू नका.

4 - रोज थोडातरी व्यायाम करा आणि तोही नियमित.

5 - खाण्याच्या बाबतीत अजिबात तडजोड करू नका

6 - तुम्ही जे खाता त्याचं प्रमाण नव्हे तर गुणवत्ता महत्त्वाची

7 - खाणं जितकं महत्त्वाचं, त्याहून पाणी पिणं जास्त महत्त्वाचं.

8 - आरोग्या व्यवस्थीत राखण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्या.

9 - कसं आणि किती खायचं हे महत्त्वाचं. त्यासाठी संतुलिच आहार घ्यावा.

10 - संतुलित आहारामुळे तुमची जीवनशैली सुधारते आणि आरोग्या व्यवस्थित राहतं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: health
First Published: May 30, 2019 04:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...