नवी दिल्ली, 26 मार्च : आजकालच्या जीवनशैलीत, अनियमित खाणे आणि कमी होणारी शारीरिक हालचाल यामुळे बहुतेकांना पोट बाहेर येण्याचा त्रास होतो. पोटाचा घेर बाहेर आला की संपूर्ण व्यक्तिमत्व बिघडवतो, शरीर अव्यवस्थित दिसते. पोटावर चरबी असण्याची अनेक कारणे असू शकतात, जसे की जास्त चरबीयुक्त पदार्थांचे सेवन करणे, व्यायाम न करणे, शारीरिकदृष्ट्या सक्रिय नसणे इ. पोटात चरबी (Belly Fat) साचणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्यामुळे अनेक आजार होण्याची शक्यता वाढते. दैनिक भास्कर वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, पोट आणि सभोवतालची चरबी (Belly and Surrounding Fat) हे हाय बीपी, स्ट्रोक, टाइप 2 मधुमेह, हृदयविकार, कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांचे कारण आहे. पोटात आढळणारे अतिरिक्त PAT सायटोकाइन्स नावाचे विष तयार करते, ज्यामुळे हृदयरोग आणि मधुमेह होऊ शकतो. अमेरिकेतील सर्वात मोठ्या फिजिकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट 'Fyt Personal Training' मधील ट्रेनर Jayne Gomez, पोटाची चरबी दुप्पट वेगाने कमी करण्यासाठी खालील 4 व्यायाम सांगितले आहेत, ज्यामुळे शरीर सक्रिय राहते आणि चरबी (Exercises to Reduce Belly Fat ) कमी होते.
हाय नी (High Knee)
यात पायमध्ये थोडे अंतर ठेवून उभे रहा. पाठ सरळ ठेवा आणि हळूहळू वेग वाढवत पाय वर आणि खाली हलवा. गुडघा किमान छातीच्या पातळीवर आणण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक पायाचे 15-15 चे 3 सेट करा. म्हणजेच एका वेळी 30 वेळा.
प्लॅक (Plank)
पुशअप स्थितीत या. शरीराचा भार कोपरावर घ्या. डोके खाली, हात जमिनीवर समांतर. धड वाकू देऊ नका, शरीर सरळ ठेवा. 30 सेकंदांचे 3 सेट करा.
हे वाचा - 2022 Baleno Facelift कार आहे की वडापाव! मिनिटाला खपतेय एक कार
माउंटेन क्लाइंबर (Mountain Climber)
पुशअप स्थितीत जा. एक पाय विरुद्ध हाताच्या दिशेने आणून, छातीजवळ आणा. आता दुसरा पाय पुढे करा. प्रत्येक पायाने 15 वेळा करा, म्हणजे एकूण 30 वेळा 3 सेट करा.
हे वाचा - स्ट्रेस घालवण्यासाठी हा सर्वात सोपा उपाय आहे; संशोधनातूनही आता झालं स्पष्ट
सीटेड नी टक्स (Seated Knee Tucks)
नितंबांवर बसताना, पाय जमिनीवरून एकत्र उचला. श्वास सोडताना दोन्ही पाय छातीजवळ आणा. काही सेकंद थांबा. आता श्वास घेताना पाय पुढे सरकवा. 15-15 चे 3 सेट करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Weight, Weight loss