Home /News /news /

Diabetes Risk: भारतात प्री-डायबेटिक रुग्णांची संख्येत वाढ; अशी ओळखा आजाराची लक्षणं, जाणून घ्या सविस्तर

Diabetes Risk: भारतात प्री-डायबेटिक रुग्णांची संख्येत वाढ; अशी ओळखा आजाराची लक्षणं, जाणून घ्या सविस्तर

भारतात केलेल्या रिसर्चनुसार प्री डायबेटिक्स म्हणजेच पूर्व डायबेटिसचा प्रसार एकूण लोकसंख्येच्या सुमारे 15 % असल्याचं समोर आलं आहे. सहापैकी एक भारतीय प्रौढ नागरिक प्री-डायबेटिक असल्याचं स्पष्ट झालं आहे.

नवी दिल्ली, 24 मे: आपल्या भारतात डायबेटिक रुग्णांची (Diabetics) संख्या वाढत आहे. प्री-डायबेटिक्सची (Pre-Diabetics) तर साथ आल्यासारखी परिस्थिती असल्याचं बोललं जातं. पण या समस्येकडे नेहमी दुर्लक्ष केलं जातं. भारतात केलेल्या रिसर्चनुसार प्री डायबेटिक्स म्हणजेच पूर्व डायबेटिसचा प्रसार एकूण लोकसंख्येच्या सुमारे 15 % असल्याचं समोर आलं आहे. प्री डायबेटिक्स म्हणजे जे रुग्ण डायबेटिस होण्याच्या सीमारेषेवर उभे आहेत असे रुग्ण. यासाठी काही लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. सहापैकी एक भारतीय प्रौढ नागरिक प्री-डायबेटिक असल्याचं स्पष्ट झालं आहे. याबद्दल ‘फायनॅन्शियल एक्सप्रेस’मध्ये सविस्तर माहिती देण्यात आली आहे. चेन्नईमधील अपोलो हॉस्पिटलचे सीनिअर कन्स्लटंट, एन्डोक्रॉनॉलॉजिस्ट डॉ. एन.के.नारायणन यांनी याबद्दलची महत्त्वाची माहिती दिली आहे. काही विशिष्ट वयोगट किंवा काही ठराविक गुणधर्म असलेल्या लोकसंख्येला याचा धोका जास्त आहे का असा प्रश्न त्यांना विचारला असता त्यांनी प्री-डायबेटिक्सबाबतचे धोके समजावून सांगितले. साधारणपणे जास्त वजन असलेले (Overweight), 45 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्यांना प्री-डायबेटिक असण्याचा धोका जास्त असतो. तसंच पालक किंवा भाऊ किंवा बहीण यांच्यापैकी कोणाला टाईप 2 चा (History Of Type 2 Diabetics In Parent, Brother or Sister) मधुमेह असल्यासही ही शक्यता वाढते. त्याशिवाय अत्यंत कमी व्यायाम किंवा शारीरिक हालचाल (Inadequate physically activity ) (आठवड्यातून तीन वेळेपेक्षाही कमी), गर्भावस्थेत मधुमेह झाला असल्यास ( History of gestational diabetes), पॉलिसिस्टीक ओव्हरी सिंड्रोम असल्यासही (History of polycystic ovary syndrome) रुग्ण प्री-डायबेटिक होण्याची शक्यता जास्त असते, असं त्यांचं म्हणणं आहे. यापैकी काहीही कारण असल्यास लगेचच चाचण्या तसंच प्री-डायबेटिक चाचण्या जास्त वेळा करून घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. राज्यात Corona ची चौथी लाट?, राजेश टोपेंनी दिलं स्पष्ट उत्तर  कोणताही धोका नसलेल्या 45 पेक्षा जास्त वयाच्या लोकांना, टाईप 2 डायबेटिसचा कौटुंबिक इतिहास असलेल्या, जास्त वजन किंवा लठ्ठपणा असल्यास, बैठी जीवनशैली असल्यास, चांगल्या कोलेस्टेरॉलचं प्रमाण असल्यास किंवा पॉलिसिस्टीक ओव्हरी सिंड्रोम असल्यास,फॅटी लिव्हर डिसीज म्हणजेच यकृताचा आजार असल्यास, गर्भारपणामध्ये मधुमेह झाला असल्यास किंवा जन्माच्या वेळेस बाळाचं वजन 4 किलोंपेक्षा जास्त असल्यास त्या व्यक्तींसाठी चाचण्या अत्यंत गरजेच्या आहेत. फास्टिंग ग्लुकोज आणि HbA1c (8 आठवड्यांची सरासरी रक्तातील साखरेची पातळी) किंवा ‘ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट’ या चाचण्या करून घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या चाचण्यांचे निष्कर्ष नॉर्मल आले तर याच चाचण्या किमान दर तीन वर्षांनी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. जर एखाद्या व्यक्तीमध्ये दोनपेक्षा जास्त धोकादायक लक्षणं आढळली तर चाचण्यांचं प्रमाण वाढवण्यासही डॉक्टरांनी सांगितलं आहे. प्री-डायबेटिक आणि टाईप 2 मधुमेह हे आजार जीनवशैलीशी निगडीत आजार आहेत. त्यामुळे आहारत योग्य बदल, पुरेशी शारीरिक हालचाल, व्यायाम आणि योग्य प्रमाणात वजन कमी करणं यामुळे डायबेटिस टाळला जाऊ शकतो किंवा प्री डायबेटिक्सही रोखला जाऊ शकतो. 150 मिनिटं चालण्याचा नियमित व्यायाम हा पुरेसा असतो. तसंच साधारणपणे 6 ते 10 % वजन कमी करण्यामुळे प्री-डायबेटिक्सवर मात करता येते. औरंगाबाद हादरलं..! पती-पत्नीची हत्या; कुजलेल्या अवस्थेत आढळले घरात मृतदेह जवळपास 25% लोकांमध्ये 3 ते 5 वर्षांत प्री-डायबेटिक्सचे रुपांतर टाईप 2 च्या डायबेटिसत होते. तर जवळपास 70% लोकांमध्ये प्री-डायबेटिक्स त्यांच्या आयुष्यभरासाठी मधुमेह म्हणून सोबत राहतो. वर सांगितलेली धोकादायक लक्षणं (अपुरी शारीरिक हालचाल, व्यायामाची कमतरता, वजनात झपाट्यानं वाढ होणं) ज्यांना आहेत, त्यांनी त्याकडे जर वेळीच लक्ष दिलं नाही तर त्याचं रुपांतर डायबेटिसत होतं. टाईप 2 डायबेटिसचं निदान झाल्यावर लगेचच जर जीवनशैलीत डाएट आणि अन्य गोष्टींमध्ये योग्य बदल केला तर त्या डायबेटिसवर मात करता येते असं संशोधनातून सिद्ध झालं आहे. दररोज 10,000 पावलं चालणं किंवा आठवड्यात किमात अडीच तासांचा व्यायाम केलेल्या व्यक्तींच्या जवळपास 500 ते 750 कॅलरीज कमी होतात आणि कोणत्याही औषधांविना त्यांच्या रक्तातील साखरेची पातळीही कमी होते असं अभ्यासातून स्पष्ट झालं आहे. अर्थात, टाईप 2 डायबेटिस असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत हे शक्य होतं असं नाही. डायबेटिसला लांब ठेवण्यासाठी पाच महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेणं गरजेचं आहे. पहिलं म्हणजे तुमचं जास्तीचं वजन कमी करा. तुमच्यासाठी योग्य असलेल्या वजनात येण्याचा प्रयत्न करा. वजन जास्त असलेले किंवा लठ्ठ असलेल्या व्यक्तींनी सध्याच्या वजनापेक्षा 6 ते 10 टक्के वजन कमी करण्याचा प्रयत्न करण्याचा सल्ला दिला गेला आहे. तुमच्या शारीरिक हालचालीचं प्रमाण वाढवा. दररोज किमान अर्धा तास किंवा तुम्हाला योग्य असेल तसा एरोबिक व्यायाम (चालणं, सायकल चालवणं, पोहणं) करा, तसंच आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व्यायाम (वजन उचलणं, योगा) करा. आरोग्यपूर्ण खाण्याच्या सवयी लावून घ्या. जास्त कार्बोहायड्रेट असलेले पदार्थ टाळा, तुमच्या जेवणातलं फायबरचं प्रमाण वाढवा. रोज ताजी फळं आणि भाज्या खा. धूम्रपानामुळेही टाईप 2 चा डायबेटिस होण्याची शक्यता असते. त्यामुळे धूम्रपान टाळा. ज्यांना जास्त धोका आहे त्या व्यक्तींची चाचणी लवकर करून घेणं आणि मधुमेह टाळण्याच्या दृष्टीने गरजेचं असेल काही काळजीपूर्वक पावलं उचलणं महत्त्वाचं आहे (उदा- फास्टिंग ग्लुकोज शुगर कमी असेल तर, गुड कोलेस्टॉरेलची पातळी कमी असेल तर, हाय ट्रायगिलसराईड्स असतील तर) एकूणच बदलत्या जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि खाण्यापिण्याच्या बदललेल्या सवयी यांमुळे अगदी तरुण वयातच मधुमेह होण्याचं प्रमाण वाढलं आहे. पण या लक्षणांकडे वेळीच लक्ष दिलं आणि आपल्या जीवनशैलीत योग्य ते बदल केले तर प्री-डायबेटिक्स टाळता येऊ शकतो. (हा लेख चेन्नईतील अपोलो हॉस्पिटलचे सीनिअर कन्सल्टंट आणि एन्डोक्राइनॉलॉजिस्ट डॉ. एन. के. नारायणन यांनी लिहिला आहे.)
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Health, Health Tips

पुढील बातम्या