पोटदुखीमुळे त्रस्त आहात? जाणून घ्या किडनीच्या कॅन्सरची लक्षणं

सुरुवातीलाच लक्ष दिलं तर वाचू शकतो या जीवघेण्या आजारापासून तुमचा जीव

News18 Lokmat | Updated On: Apr 18, 2019 05:35 PM IST

पोटदुखीमुळे त्रस्त आहात? जाणून घ्या किडनीच्या कॅन्सरची लक्षणं

धकाधकीचं जीवन आणि बिघडलेल्या खाण्या पिण्याच्या सवयीमुळे कॅन्सरसारखे जीवघेणे रोग झपाट्याने वाढत आहेत. ब्रेस्ट कॅन्सर, ब्लड कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर, असे कॅन्सरचे अनेक प्रकार असले तरी किडनीचा कॅन्सर हा सर्वात जीवघेणा आहे.

कोणताही आजार किंवा रोग होण्याआधी आपलं शरीर त्याचे संकेत देतं. त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. सुरुवातीलाच नीट काळजी घेतली तर या जीवघेण्या रोगापासून तुम्ही स्वतःला वाचवू शकता.

लाल रक्तपेशी तयार करणं आणि त्या नियंत्रित ठेवण्याचं काम आपल्या शरीरातील दोन्ही कडण्या करत असतात. किडनीचा कॅन्सरमुळे शरीरातील लाल रक्तपेशी तयार होण्याचं प्रमाण झपाट्यानं कमी होतं. ज्यामुळे साधारण काम करतानाही खूप थकवा जाणवतो.

Loading...

अनेकजण पोटदुखीकडे दुर्लक्ष करतात. पण कदाचित तो किडनी कॅन्सरही असू शकतो. जेव्हा हा रोग बळावतो, तेव्हा ओटीपोटात तीव्र वेदना व्हायला लागतात. लघवी करताना रक्त जात असेल तर किडनीचा कॅन्सर असण्याची दाट शक्यता असते.

त्यातच भूकही कमी झाली असेल आणि झपाट्यानं वजनही कमी होत असेल तर ही बाब गंभीर समजून तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: health
First Published: Apr 18, 2019 05:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...