स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यामुळेच दात किडतात; त्यासाठी करा 'हे' उपाय

स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यामुळेच दात किडतात; त्यासाठी करा 'हे' उपाय

सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे दिवसातून दोनदा ब्रश करायला हवा

  • Share this:

मुंबई, 8 जून - जेव्हा अन्नाचे कण दाताच्या चारही बाजूंना जमा होतात तेव्हा तोंडातील बॅक्टेरिया त्यापासून आम्ल तयार करतात. ज्यामुळे दातांवरील इनॅमेल गळून पडतं. अशाप्रकारे हळूहळू दातांवर थर जमा होतो. जेव्हा हा थर आतमध्ये डेंटिनपर्यंत पोहोचतो तेव्हा दात संवेदनशील होतात. अगदी कमी गार पाणी प्यायल्यानंतरसुद्धा दातांना कळ लागते.

मन आणि मेंदू शांत ठेवतात 'ही' योगासने

दात किडू नये यासाठी हे कराच - सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे दिवसातून दोनदा ब्रश करायला हवा. विशेषतः रात्री, कारण रात्री झोपल्यानंतर थुंकी गिळण्याची प्रक्रिया कमी होते. अन्न तोंडात असेल तर बॅक्टेरिया आणि त्यापासून आम्ल तयार होतं. त्यामुळे रात्रीच्यावेळेस अशा पदार्थांचं सेवन करा ज्यामुळे दात स्वच्छ होतील. म्हणजेच गाजर, बीट, कोबी, कच्च्या भाज्या. फळांचंही नियमित सेवन करायला हवं. जेवण झाल्यानंतर गोड पदार्थ न खाता जेवताना खावा. सलाद, बडिशेप आणि ओल्या नारळाचं सेवनसुद्धा फायदेशीर ठरतं.

पित्त आणि कफनाशक आहे 'ही' भाजी; जाणून घ्या फायदे

दात किडण्याची लक्षणं - दातांवर करडा किंवा काळा डाग पडतो किंवा ज्या पोकळीमध्ये अन्न अडकतं, त्या दातांची संवेदनशीलता वाढते. अनेकदा ते दुखतात. अशावेळेस लगेच डेंटिस्टचा सल्ला घ्यायला हवा.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 8, 2019 10:27 PM IST

ताज्या बातम्या