तांब्याच्या भांड्यातलं पाणी प्यावं... 'ही' आहेत 10 कारणं

तांब्याच्या भांड्यातलं पाणी प्यावं... 'ही' आहेत 10 कारणं

तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी रोज सकाळी उपाशी पोटी प्यायल्याने आरोग्या राहतं निरोगी

  • Share this:

मुंबई, 16 मे : शरीर सुदृढ ठेवायचं असेल तर दररोज व्यायाम, संतुलित आहार आणि शुद्ध आणि स्वच्छ पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी रोज सकाळी उपाशी पोटी प्यायल्याने आरोग्या निरोगी राहतं. आज आम्ही तुम्हाला तांब्याच्या भांड्यातलं पाणी प्यायल्याने कोणकोणते फायदे होतात हे सांगणार आहोत.

ह्रदयरोग - जर तुम्हाला ह्रदयरोग किंवा रक्तदाबाची समस्या असेल तर त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही दररोज सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी ताब्याच्या भांड्यातलं पाणी प्यायला हवं. रक्तदाब सुरळीत ठेवण्यासाठीसुद्धा हे फायदेशीर आहे.

कॅन्सर - अलीकडे कर्करोगांचं प्रमाण झपाट्याने वाढलं आहे. तांब्यातील तांब्याती अॅन्टीऑक्सिडंट या घटकामध्ये कर्करोगाशी सामना करण्याची क्षमता असते.

तुम्ही वाढलेलं पोट लपवण्याचा प्रयत्न करता का? 'या' चुका करू नका

विषाणुजन्य आजार - तांब्याच्या भांड्यात ठेवलेल्या पाणी हे शुद्ध मानलं जातं. डायरिया आणि कावीळ सारखे आजार पसरवणारे बॅक्टेरिया मेल्याने हे आजार तुमच्यापासून दूर राहतात.

सांधेदुखी - तांब या धातुमध्ये दाह कमी करण्याची क्षमता असते. संधीवात किंवा सांधेदुखीचा जर तुम्हाला त्रास असेल तर दररोज ताब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी प्यायला हवं. यामुळे हाडं मजबूत बनतात आणि रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढते.

चेहऱ्यावरील सुरकुत्या - चेहऱ्यावर अकाली पडणाऱ्या सुरकुत्या कमी करण्यासाठी तांब्याच्या भांड्यातलं पाणी फायदेशीर ठरतं. तांब्यातलं अ‍ॅन्टीऑक्सिडंट हे नवीन पेशी तयार करण्याचं काम करतं.

सकाळी उठल्यावर झोप नीट झाली नाही असं वाटतं? वेळीच लक्ष द्या हे असू शकतं कारण

शरीरावरी जखमा - तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी हे अॅन्टीबॅक्टरीयल असल्यामुळे ज्याप्रमाणे तुमची रोगप्रतीकारक शक्ती वाढविण्यासाठी आणि शरीरावरील जखमा भरून काढण्यासाठी लाभदायक ठरतं. अ‍ॅन्टीवायरल असल्याने दाह कमी करण्यासाठी सुद्धा याची मदत होतो.

थायरॉईड - तांब्याच्या भांड्यातलं पाणी प्यायल्याने शरीरातील थायरॉईडचे हार्मोन संतुलित राहतात. ताब्यातले गुणकारी खनिजं थायरॉईड ग्रंथीचं कार्य सुधारण्यासाठी मदत करतं.

वजन कमी करण्यासाठी - तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. पचनसंस्थेला चालना मिळल्याने शरीरातील मेद कमी होण्यात मदत होते. मेद कमी झाल्याने अनावश्यक चरबी जमा होत नाही.

रागाचा पारा नियंत्रणात ठेवयचा असले तर हे कराच तुम्ही

पचनसंस्थेतील दोष दूर होतो - अनेकांना पोटात तयार होणाऱ्या गॅसमुळे पित्त आणि अल्सरचा त्रास होतो. तांब्याच्या भांड्यातले पाणी प्यायल्याने जंतूनाशक गुणधर्म पोटातील जिवाणूंचा नाश करतात. पचनक्रिया सुरळीत झाल्याने पोट स्वच्छ राहतं.

त्वचा रोग - पाण्यात मिसळलेल्या तांब्याच्या गुणधर्मांमुळे शरीरात मेलॅनीनची निर्मिती होतो. त्यामुळे तांब्याच्या भांड्यातलं पाणी हे त्वचारोगांसाठी अत्यंत गुणकारी आहे. तांब्याच्या भांड्यातल्या पाण्याने आंघोळ केल्यानेसुद्धा त्वचा रोग दूर होतात.

First published: May 16, 2019, 5:47 PM IST
Tags: health

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading