शवगृहात धक्कादायक प्रकार, उंदीर आणि अळ्यांनी खाल्ला मृतदेह

शवगृहात धक्कादायक प्रकार, उंदीर आणि अळ्यांनी खाल्ला मृतदेह

मृताचा कोरोना अहवाल नकारात्मक आल्यावर रुग्णालय प्रशासनाने मृताच्या नातेवाईकांना घेण्यास सांगितलं. परंतु मृताच्या नातेवाईकांनी मृतदेह पाहिल्यावर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.

  • Share this:

ललितपूर (उत्तर प्रदेश), 29 मे : जिल्हा आरोग्य विभागाच्या दुर्लक्षपणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे स्थलांतरित मजुराचा मृतदेह पूर्णपणे कुजल्याचं समोर आलं आहे. मृताच्या कुटूंबियांनी असा आरोप केला आहे की मृतदेहाला अळी लागल्यामुळे तो कुजला, त्यामुळे मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी आरोग्य विभागावर गंभीर आरोप केले आहेत.

खरंतर, काही दिवसांपूर्वी बिहारमधून निघालेला परप्रांतीय कामगार महाराष्ट्रातून प्रवास करून ललितपूर जिल्ह्यात पोहोचले होता. त्यानंतर अचानक त्याची तब्येत बिघडली ज्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृत कामगारांचं नाव नसीमुद्दीन असं असून त्याचे वय 58 वर्षे होते.

पुण्यातील अक्षय बोऱ्हाडे प्रकरणाला नवं वळण, FB व्हिडिओनंतर उमटले राजकीय पडसाद

या मजुराचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्यानंतर जिल्हा आरोग्य विभागाने मृतदेह ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयाच्या शवगृहामध्ये ठेवला. त्यासोबतच शरीरातून  कोव्हिड-19 चा नमुना तपासणीसाठी पाठवला गेला. मृताचा कोरोना अहवाल नकारात्मक आल्यावर रुग्णालय प्रशासनाने मृताच्या नातेवाईकांना घेण्यास सांगितलं. परंतु मृताच्या नातेवाईकांनी मृतदेह पाहिल्यावर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.

पुणे कोरोनानं हादरलं, कामगाराच्या अचानक मृत्यूनंतर आला धक्कादायक रिपोर्ट

मृताचा मृतदेह पूर्णपणे कुजला होता, तसंच एका खोल फ्रीझरमध्ये ठेवल्यामुळे, शरीरात कीटकं आढळून आले होते आणि त्याचं शरीर किडे आणि उंदीराने खाल्लं होतं. ज्यावर मृताच्या कुटुंबीयांनी आरोग्य विभागावर दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप केला आहे. एवढेच नव्हे तर मृताचा नातेवाईक परवेज आलम यांनी रुग्णालयात आपला संताप व्यक्त केला आहे आणि पुढे उच्च अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.

बलात्कारानंतर पीडितेचा आला धक्कादायक वैद्यकीय रिपोर्ट, अल्पवयीन वयातच झाली गरोदर

First published: May 29, 2020, 2:03 PM IST
Tags:

ताज्या बातम्या