डेंग्यूपासून वाचण्यासाठी 'ही' आहेत 5 सुपरफूड्स

डेंग्यूपासून वाचण्यासाठी 'ही' आहेत 5 सुपरफूड्स

ही पाच फळं डेंग्यू आणि मलेरिया या आजारात सुपरफूड ठरतात. कारण यामुळे रुग्णाच्या शरीरात कमी झालेल्या प्लेटलेट्स झपाट्याने वाढतात.

  • Share this:

मुंबई, 16 मे : डेंग्यू Dengue झालेल्या रुग्णांच्या रक्तातल्या प्लेटलेटची platelets संख्या झपाट्याने कमी होते. ती वाढवण्यासाठी रक्त किवी, पपई, डाळिंब, संत्रे, गांजर, बीट हे डेंग्यू रुग्णाच्या शरीरात कमी झालेल्या प्लेटलेट्स वाढविण्याचं काम करतात, यामुळे या फळांना 'सुपरफूड' असं म्हटलं जातं. आज आम्ही तुम्हाला प्लेटलेट्स वाढविणार्या या पाच 'सुपरफूड'बद्द्ल माहिती सांगणार आहोत.

किवी - फायबर आणि अँटी-ऑक्सीडंटचा मुख्य स्त्रोत असलेल्या किवीमध्ये अनेक गुणकारी तत्त्व आढळतात, ज्यामुळे डेंग्यू झालेल्या रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. किवीमध्ये व्हिटॅमिन 'सी' आढळतं, जे शरीरातील पेशींना नष्ट होऊ देत नाही आणि त्यांचं पोषण करतं तसंच शरीरातील समस्या दूर करतं. डोळ्यांसाठीसुद्धा किवी फायदेशीर आहे.

तुम्ही वाढलेलं पोट लपवण्याचा प्रयत्न करता का? 'या' चुका करू नका

पपई - डेंग्यूच्या रुग्णांसाठी पपईचं झाड हे संजीवनी आहे. डेंग्यू झालेल्या रुग्णाला पपईच्या पानांचा रस दिला तर फायदेशीर ठरतं. पपईच्या पानांमध्ये chymopapin आणि papain असे दोन एंझाइम्स असतात.

जे शरीरातील रक्त प्रवाही ठेवतं. तसंच झपाट्याने कमी झालेल्या रक्तातल्या प्लेटलेट्स वाढवण्याचं काम करतात.

डाळिंब - डाळिंबाचा ज्यूस घेतल्याने शरीरातील अशक्‍तपणा कमी होतो. शरीरातील रक्‍ताचं प्रमाण वाढविण्‍यासाठी डाळिंब फायदेशीर आहे. शरिराची प्रतिकार शक्‍ती वाढविण्‍यासाठी डेग्यू रुग्णाने दररोज दोनता डाळिंबाचा रस घ्यायला हवा.

कितीही प्रयत्न करा, या 10 गोष्टी तुमच्याकडे नसतील तर कधीच होणार नाही बारीक

संत्री - संत्र्यात अनेक पोषक तत्त्व असतात जे आरोग्य डेंग्यू रुग्णांसाठी फायदेशीर ठरतात. पोषक तत्त्व भरपूर प्रमाणात असल्यामुळे आणि मुबलक प्रमाणात असलेल्या व्हिटामिन सी मुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते.

बीट - बीटच्या रसात मुबलक प्रमाणात अॅन्टीऑक्साडेंट्स असतं. ज्यामुळे शरीरातील प्रतिकारक क्षमता वाढते. डेंग्यू रुग्णाने दररोज ग्लासभर बीटाचा रस घेतला तर कमी झालेल्या प्लेटलेट्स झपाट्याने वाढतात.

First published: August 20, 2019, 4:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading