मुंबई, 18 मे : खजूरमध्ये कॅल्शिअम, लोह, खनिज, फॉस्फोरस, अमीनो अॅसिड आणि व्हिटॅमिन मुबलक प्रमाणात असल्यामुळे खजूर हे शक्ती वाढविण्यासाठी अत्यंत गुणकारी ठरतं. वजन वाढविण्यासाठी आणि अशक्तपणा कमी करण्यासाठी खजूर हे अत्यंत गुणकारी आहे. जाणून घ्या खजूराच्या सेवनाने आणखी कोणते फायदे होतात.
हृदय रोग - खजूरात पोट्याशियम असतं. दररोज रात्रभर पाण्यात भिजवून ते सकाळी सेवन केल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतं. यामुळे ह्रदयाचा झटका आणि संबंधित इतर आजारांचा धोका कमी होतो.
पालक म्हणून तुम्ही आपल्या मुलांसोबत असं तर वागता नाही ना? करू नका 'या' चूका
वजन वाढतं - खदूरात सगळ्यात जास्त प्रमाणात कॅलीज असतात. प्रोटीन, व्हिटॅमिन्स आणि साखरही असते. जर तुम्हाला वजन वाढवायचं असेल त्यासाठी खजूर उपयूक्त आहे.
बद्धकोष्ठ - खजूरात सॉयुबल फाइबर असतात त्यामुळे पोट साफ राहतं. खजूर दररोज रात्रभार पाण्यात भिजवून त्याचं सकाळी सेवन केलं तर बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.
क्षणात दूर होईल किचनमधली दुर्गंधी, त्यासाठी करा 'हे' उपाय
कॅन्सर - खजूराच्या सेवनामुळे पोटाच्या कॅन्सरचा धोका कमी होतो असं एका संशोधनात समोर आलं आहे.
अशक्तपणात - खजूराच्या सेवनामुळे रक्तातलं हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं आणि उर्जाही मिळते. त्यामुळे अशक्तपणावर खजूर हे अत्यंत गुणकारी आहे.