पावसात भिजल्यावर घ्या ही काळजी, आजारांपासून राहाल दूर

पावसात भिजल्यावर घ्या ही काळजी, आजारांपासून राहाल दूर

अनेकदा पावसात भिजल्यानंतर लगेचच आपल्याला सर्दी-खोकल्यासारखे आजार होतात. अशावेळी काही सोप्या काही उपायांनी हे आजारांपासून तुम्ही दूर राहू शकता.

  • Share this:

मुंबई, 17 जुलै : सध्या पावसाचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे अनेकदा आपण पावसात भिजून घरी किंवा ऑफिसमध्ये जातो. अनेकदा यावरून घरातल्यांचं ऐकूनही घ्यावं लागतं. अनेकदा आपण फॅन बंद करून ओले झालेले केस कोरडे करतो. पण नुकत्याच झालेल्या एका संशोधनात, पंख्याखाली किंवा एसीमध्ये बसल्यानं सर्दी किंवा खोकला असे आजार होत नसल्याचं दिसून आलं आहे. पण जर तुमच्या आसपास सर्दी खोकला झालेली व्यक्ती असेल किंवा सर्दी किंवा खोकल्याचे व्हायरस असतील तर मात्र तुम्हाला हे आजार होऊ शकतात. याशिवाय पावसात अनेकांना संधिवाताचा त्रास होतो.

आरोग्याशी खेळ ! रिकाम्या पोटी कॉफी पिता? हे नक्की वाचा

यावर नुकत्याच झालेल्या व्हर्जिनिया युनिव्हर्सिटीनं केलेल्या एका रिसर्चमध्ये तुमचं रोजच्या कामाचं वेळापत्रक नीट नसेल तसेच तुमची जीवनशैली जलद असेल तर तुम्हाला कोणताही आजार होऊ शकतो. तसेच पावसाळा आणि संधिवाताच्या त्रासाचा काहीही संबंध नाही. आपण नेहमीच AC मध्ये काम करत असतो. पण पावसाळ्यात दर एका तासानंतर 10 मिनिटं AC मधून बाहेर पडा. पावसाळ्यात होणारा त्रास टाळायचा असेल खुर्चीवर बसताना व्यवस्थित बसा. बसताना तुमचे गुढगे झाकले जातील याची काळजी घ्या.

हाडं मजबूत ठेवायची आहेत, मग हे 4 पदार्थ खाणं टाळा

काही वेळा वजन जास्त असल्यास पाय आणि त्याचा सर्व भार गुडघ्यांवर येतो. ज्यामुळे सांधेदुखीचा त्रास सुरू होतो. यापासून सुटका मिळवण्यासाठी कोमट तेलानं सांध्यांना मालिश करा. तसेच जेवणात प्रोटीनयुक्त डाएट घ्या. पावसाळ्यात केस ओले झाल्यास पंख्याच्या हवेवर ते कोरडे करा. ज्यामुळे तुम्हाला सर्दी-खोकल्यासारखे आजार होणार नाहीत. पण लक्षात असू द्या यावेळी तुमच्या आसपास जर या आजारांचे व्हायरस असतील तर मात्र तुम्हाला हे आजार होण्याची शक्यता असते.

'हे' नुकसान समजल्यानंतर तुम्ही चहासोबत बिस्किट खाणं लगेचच बंद कराल

==================================================================

कंबरे एवढ्या पाण्यातून जाण्यासाठी ग्रामस्थांची कसरत, प्रशासनाचा मात्र कानाडोळा

First published: July 18, 2019, 6:40 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading