नखं देतात तुमच्या आरोग्याचे संकेत; वेळीच ओळखा 'ही' लक्षणं

नखं देतात तुमच्या आरोग्याचे संकेत; वेळीच ओळखा 'ही' लक्षणं

नखांचा संबंध केवळ सौंदर्याशीच नव्हे तर आरोग्याशीही असतो.

  • Share this:

मुंबई, 19 मे : नखांचा संबंध केवळ सौंदर्याशीच नव्हे तर आरोग्याशीही असतो. नखांवर दिसणाऱ्या पांढऱ्या आणि गुलाबी रंगाच्या डागांसाठी प्रत्येकवेळी मेनिक्युअरचीच गरज असते असं नाही, तर ते डाग तुमच्या आरोग्याची धोक्याची सूचना देखील देऊ शकतात. आरोग्याचा आरसा असलेल्या नखांचे संकेत तुम्ही वेळीच ओळखायला हवेत. नखांवरुन आजार कसे ओळखावे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ही लक्षणं दिसताच आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असं तज्ज्ञ सांगतात.

1 - नखं पातळ झाली असतील तर तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण क्रिया बिघडली असल्याचं ते लक्षण आहे असं समजावं.

2 - जर नखांर उभ्या पांढऱ्या रेषा असतील तर तुमची रोगप्रतिकारकशक्ती कमी झाली आहे असे सकेत देतात.

3 - नखांवरील आडव्या रेषा या नखांचंच आरोग्य बिघडलं असल्याचे संकेत देतात.

डोक्यावरचं टेंशन तुम्हाला दूर करायचं असेल तर 'या' 5 गोष्टी कराच

4 - जर नखं वाकडी-तिकडी झाली असतील तर तुमचं मानसिक असंतुलन बिघडू शकतं. तसंच त्वचारोग आणि अॅनिमायासुद्धा होऊ शकतो.

5 - जर तुमच्या नखांवर बारीक शिरा दिसत असतील तर न्यूरोसिसचा आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

6 - नखांमध्ये जर वेदना होत असतील तर ती बुरशीच्या संसर्गाची ती लक्षणं असतात. बहुतांश लोकांमध्ये हा पायाच्या बोटांना होतो.

7 - तुमच्या नखांवर निळसर रंगाचा डाग दिसल्यास ते तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. कारण हे डाग तुमच्या शरीराला याग्य प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्याचं दर्शवतात.

आनंदी जीवनासाठी मनाची एकाग्रता आवश्यक, करा 'हे' उपाय

8 - नखांच्या रंगात अचानक बदल झाल्यास ते काळजीचं कारणं असू शकतं. नखांना एक नैसर्गिक रंग असतो, त्याएवजी ती पांढरी दिसू लागली तर तुमच्या यकृतामध्ये समस्या निर्माण झाली असल्याचे ते संकेत असतात. हिपॅटायटीसचं हे प्राथमिक लक्षण असू शकतं.

9 - जर तुमच्या नखांचा रंग पिवळसर दिसत असेल ते एखाद्या दीर्घकाळाच्या आरोग्य समस्येचं लक्षण असू शकतं.

10 - ठिसूळ झालेली नखं सहजपणे तुटतात किंवा दुमडल्या जातात. ठिसूळ झालेली अशी नखं ही तुमच्या शरीरात लोहाचं प्रमाण कमी आहे कमतरता दर्शवितात. अॅनिमिया किंवा त्यासारखे आजार तुम्हाला होऊ शकतात.

First published: May 19, 2019, 2:51 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading