ईएमआयच्या ३० हजारांच्या रकमेसाठी एचडीएफसीचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवींची केली हत्या

आज सकाळी काकड भागात छिन्न विछिन्न अवस्थेत हा मृतदेह सापडला.

News18 Lokmat | Updated On: Sep 11, 2018 08:00 AM IST

ईएमआयच्या ३० हजारांच्या रकमेसाठी एचडीएफसीचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवींची केली हत्या

मुंबई, ११ सप्टेंबर-  बुधवारपासून बेपत्ता असलेले एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी यांच्या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलंय.  ईएमआयवर घेतलेल्या दुचाकीचे कर्ज चुकविण्यासाठी सिद्धार्थ यांची गळा चिरून हत्या करण्यात आली. या हत्येची कबूली २० वर्षीय आरोपी रईस उर्फ सरफराज शेख याने न्यायालयात दिली. न्यायालयाने या प्रकरणी त्याला १९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मूळचा नवी मुंबईतील रहिवाशी असलेला सरफराज हा संघवी यांच्या लोअर परळच्या कमला मिल कंपाऊंडमध्येच बिगारीचे काम करायचा. त्यामुळे दोघांची तोंड ओळख झाली होती.

काही महिन्यांपूर्वी सरफराजने दुचाकी ईएमआयवर घेतली होती. या कर्जाचे हप्ते ही थकलेले होते. घरातील खर्च आणि दुचाकीचे हप्ते मिळणाऱ्या मिळकतीत भागवणे शक्य होत नसल्याने दिवसेंदिवस कर्जाचा डोंगर डोईजड होत होता. यातूनच चाकूचा धाक दाखवून कुणाकडून तरी पैसे उकळून कर्ज भागवण्याचे सरफराजने ठरवले होते. संघवी कार्यालयात कायम सकाळी ९ पर्यंत यायचे तर रात्री ८ पर्यंत निघायचे. तोंड ओळख असलेले संघवी हे बँकेत मोठ्या हुद्यावर असल्याची कल्पना सरफराजला होती. सिद्धार्थच्या या सर्व गोष्टींकडे लक्ष ठेवून होता. एका महिन्याच्या ईएमआयसाठी सरफराजने सिद्धार्थची हत्या केली.

बेपत्ता झालेले एचडीएफसी बॅंकेचे अधिकारी सिद्धार्थ संघवी यांचा मृतदेह कल्याणच्या मलंग गड रोडवरील काकड भागात सापडलाय. मुंबई पोलीस आणि स्थानिक पोलीस सोमवारी दुपारपासून मृतदेहाचा शोध घेत होते. मात्र मृतदेह सापडत नव्हता. आज सकाळी काकड भागात छिन्न विछिन्न अवस्थेत हा मृतदेह सापडला. बुधवारपासून बेपत्ता असलेले एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी यांची हत्या झाल्याचं उघड झाल्यानंतर संघवी यांच्या हत्येप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं होतं. मुंबईच्या मलबार हिल येथे राहणारे सिद्धार्थ यांची कार नवी मुंबईत आढळून आली होती. कारमध्ये रक्ताचे डागही होते. त्यामुळे संघवी यांचा घातपात झाल्याची शक्यता बळावली होती आणि ती खरी ठरली.

VIDEO : ...आणि 'त्यांनी' रस्त्यावरील खड्ड्यात केलं बाळाचं बारसं!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 11, 2018 08:00 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...