...तर कुमारस्वामी होणार नवे मुख्यमंत्री?

येडियुरप्पांनी राजीनामा दिला तर एच.डी.कुमारस्वामी सोमवारी मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता असून त्यानंतर कर्नाटकमधल्या राजकीय नाट्याचा शेवट होण्याची शक्यता आहे.

Ajay Kautikwar | News18 Lokmat | Updated On: May 19, 2018 03:05 PM IST

...तर कुमारस्वामी होणार नवे मुख्यमंत्री?

बंगळुरू,ता.19 मे: कर्नाटकमध्ये राजकीय नाट्याचा शेवटचा अंक सुरू आहे. सर्व प्रयत्न करूनही बहुमताचा आकडा जुळवता येणं अशक्य असून येडियुरप्पा बहुमत परिक्षणाच्या आधीच राजीनामा देण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

असं झालं तर राज्यपाल जेडीएस आणि काँग्रेसला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करू शकतात. असं झालं तर जेडीएसच्या विधिमंडळ पक्षाचे नेते एच.डी. कुमारस्वामी सोमवारी मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊ शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 19, 2018 03:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...