म्हणे, मंजुळा चक्कर येऊन कोसळली, हायकोर्टाने पोलिसांना फटकारलं

मंजुळाचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीत नाहीतर चक्कर येऊन कोसळल्याने झाल्याचा अजब दावा पोलिसांनी हायकोर्टात केलाय. पोलिसांचा हा अजब युक्तीवाद ऐकून हायकोर्टाने पोलिसांना चांगलंच फटकारलं,

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Jul 24, 2017 03:48 PM IST

म्हणे, मंजुळा चक्कर येऊन कोसळली, हायकोर्टाने पोलिसांना फटकारलं

 

मुंबई, 24 जुलै : भायखळा जेलमध्ये मंजुळाचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीत नाहीतर चक्कर येऊन कोसळल्याने झाल्याचा अजब दावा पोलिसांनी हायकोर्टात केला होता. पोलिसांचा हा अजब युक्तीवाद ऐकून हायकोर्टाने पोलिसांना चांगलंच फटकारलं, 'इतर प्रकरणांमध्येही दोषींना वाचवण्यासाठी अशीच मदत करता का ?' अशा खडा सवालच हायकोर्टाने क्राईम ब्रँच पोलिसांना सुनावणीदरम्यान केला. मंजुळा शेट्ये मृत्यू प्रकरणी प्रदीप भालेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आज हायकोर्टात सुनावणी झाली.

मंजुळे शेट्ये या महिला कैदीचा भायखळा जेलमध्ये पोलीस मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप आहे. तिच्या मृतदेहावरही मारहाणीच्या जखमा आढळून आल्यात. इतर कैद्यांनीही जेलर पोलिसांच्या मारहाणीतच मंजुळाचा मृत्यू झाल्याचे जबाब यापूर्वीच कोर्टात नोंदवलेत. तरीही त्याबाबत हायकोर्टाने पोलिसांना विचारणा केली असता, मंजुळाचा मृत्यू हा चक्कर येऊन कोसळल्याने झाल्याचा अजब दावा पोलिसांनी केलाय. पण हायकोर्टानंच पोलिसांच्या या युक्तीवादावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 24, 2017 03:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...