मेट्रो 3च्या खोदकामाला तात्पुरती स्थगिती

मेट्रो ३ प्रकल्पासाठी फोर्ट भागात भुयार खोदण्याच्या कामाला मुंबई हायकोर्टानं तात्पुरती स्थगिती दिली आहे. भुयार खोदताना हेरिटेज इमारतींना धोका पोहोचू शकतो ही भीती व्यक्त करणारी एक याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Sep 15, 2017 03:27 PM IST

मेट्रो 3च्या खोदकामाला तात्पुरती स्थगिती

मुंबई, 15 सप्टेंबर : मेट्रो ३ प्रकल्पासाठी फोर्ट भागात भुयार खोदण्याच्या कामाला मुंबई हायकोर्टानं तात्पुरती स्थगिती दिली आहे. भुयार खोदताना हेरिटेज इमारतींना धोका पोहोचू शकतो ही भीती व्यक्त करणारी एक याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. त्यावर सुनावणी दरम्यान कोर्टाने भुयार खोदण्याच्या कामाला तात्पुरती स्थगिती दिली आहे.

मेट्रो ३ मुळे फोर्ट परिसरातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या इमारतींना धोका असल्याचा दावा करत जे एन पेटीट या ११९ वर्ष जुन्या संस्थेच्या ट्रस्टींनी हायकोर्टात धाव घेतलीय. संपूर्णपणे भुयारी मार्ग असलेल्या अंधेरी सीप्झ ते कुलाबा या मार्गाच्या कामाकरता जी अवजड यंत्रसामुग्री मागवण्यात आलीय त्याच्या व्हायब्रेशन्समुळे अनेक जुन्या इमारतींना धोका निर्माण झालाय, तसंच जमिनीखाली खोदकाम करताना शेकडो वर्षापूर्वीच्या काही जुन्या इमारतींना यामुळे नुकसान होण्यास सुरूवात झाल्याचा दावा या याचिकेत करण्यात आलाय.

दरम्यान हायकोर्टानं गेल्या सुनावणी दरम्यान हे स्पष्ट केलं होतं की, आयआयटी मुंबईकडून हायकोर्टाच्या इमारतीची मेट्रो३ च्या संदर्भात पाहाणी करण्यात येणाराय. त्यांच्या मदतीनं इतरही इमारतींची पाहाणी करता येऊ शकेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 15, 2017 03:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...