'जान, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही', पत्रात प्रेम व्यक्त करून तरुणीची आत्महत्या

'जान, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही', पत्रात प्रेम व्यक्त करून तरुणीची आत्महत्या

तरुणीने आत्महत्या केली असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांना घटनास्थळावरून एक सुसाईट नोट मिळाली आहे.

  • Share this:

हजारीबाग (झारखंड), 07 जुलै : प्रेम प्रकरणातून किंवा आंतरजातीय विवाह केला म्हणून आत्महत्या किंवा गुन्हा घडल्याचे अनेक धक्कादायक प्रकार आपण पाहिले आहेत. असाच एक मनाला चटका लावून जाणारा प्रकार घडला आहे. प्रियकरासोबत लग्न होणार नाही या भीतीने तरुणीने आत्महत्या केली आहे. इतकंच नाही तर आत्महत्या करण्याआधी सुसाईड नोटदेखील पोलिसांना सापडली आहे.

तरुणीने आत्महत्या केली असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांना घटनास्थळावरून एक सुसाईट नोट मिळाली आहे. यामध्ये लिहल्यानुसार, तरुणीचे प्रेम संबंध असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. 'पता है जान मैं तुम्हारे बिना नहीं रह सकती' असं सुसाईड नोटमध्ये लिहण्यात आलं आहे.

पोलिसांनी या प्रकरणात तक्रार दाखल केली असून आता याचा तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरूणी हजारीबाग सदर ठाणा परिसरता राहणाऱ्या हेल्थ क्लबचे संचालकांची मुलगी आहे. प्रेम प्रकरणामुळे तरुणीने आत्महत्या केली असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पण या संदर्भात पोलिसांनी अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.

'जान, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत...'

घटनास्थळावरून पोलिसांना मिळालेल्या सुसाईट नोटमध्ये असं लिहण्यात आलं आहे. 'मी तुझ्यावर खूप प्रेम करते. पण मला तुझ्या करिअरच्या आड यायचं नाही. आणि मला भीती आहे की आपलं लग्न नाही होणार. त्यामुळे मी आत्महत्या करत आहे' असं या तरुणीने चिठ्ठीत लिहलं आहे.

मृत तरुणीच्या कुटुंबार दुखाचा डोंगर...

घरातील तरुण मुलीला अशा पद्धतीने गमावल्यामुळे संपूर्ण कुटुंबार दुखाचा डोंगर कोसळला आहे. पण मुलीने असं का केलं याबद्दल अद्याप कोणालाच काही माहित नाही. त्यामुळे पोलीस आता या प्रकरणाचा कसून तपास करत आहे.

VIDEO: 'त्या एका तक्रारीची दखल घेतली असती तर 24 जणांचे जीव वाचले असते'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 7, 2019 04:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading