मुंबई : कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ पुन्हा एकदा इडीच्या रडारवर आहे. त्यांची पुन्हा रात्री उशिरापर्यंत चौकशी करण्यात आली. बुधवारी ईडीने बँकेच्या मुख्य कार्यालयासह काही ठिकाणी छापेमारी केली आहे. या प्रकरणी ईडीकडून कागदपत्रांची तपासणी केली आहे.
हसन मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या जिल्हा बँकेची मध्यरात्री दोन वाजेपर्यंत ईडीकडून तपासणी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. संताजी घोरपडे कारखाना आणि ब्रिक्स इंडियाच्या कर्ज खात्यांची चौकशी यादरम्यान करण्यात आली. बँकेच्या मुख्य कार्यालयासह इतर शाखामध्येही तपासणी केली.
या सगळ्या घडामोडी सुरू असताना पुन्हा एकदा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांना चिमटा काढला आहे. तुम्हाला हिशोब तर द्यावाच लागणार असंही ते म्हणाले. त्यामुळे आता मुश्रीफ विरुद्ध किरीट सोमय्या
आता कोल्हापूर जिल्हा बँकांमध्ये ईडीची चौकशी सुरू. अनेक बेनामी खाते, शेतकऱ्यांच्या नावाने बोगस FD तर चौकशी होणारच, हसन मुश्रीफजी तुम्हाला हिशोबत तर द्यावा लागणार असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.
ईडीने हसन मुश्रीफ यांना ईडीकडून एका महिन्यात दुसऱ्यांदा दणका बसला आहे. त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे ईडीने एका महिन्यात दुसऱ्यांना धाड टाकून चौकशी केली. याआधी त्यांच्या घरावर धाड टाकली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: ED, Kirit Somaiya, Kolhapur