Home /News /news /

टीम इंडियामध्ये 'ऑल इज नॉट वेल'!, या 8 खेळाडूंना वाटतेय भीती?

टीम इंडियामध्ये 'ऑल इज नॉट वेल'!, या 8 खेळाडूंना वाटतेय भीती?

टीम इंडियामध्ये (Team India) सगळं ऑल इज वेल आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याला कारण ठरलं आहे ते टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने (Mohammad Kaif) केलेले आरोप.

    मुंबई, 16 जुलै : टीम इंडियामध्ये (Team India) सगळं ऑल इज वेल आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याला कारण ठरलं आहे ते टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने (Mohammad Kaif) केलेले आरोप. विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळत असलेल्या टीम इंडियामध्ये कोणत्याच खेळाडूची जागा सुरक्षित नाही, असं मोहम्मद कैफ स्पोर्ट्स तकला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाला. आता मोहम्मद कैफने केलेलं हे वक्तव्य म्हणजे टीम इंडियाच्या खेळाडूंची व्यथा आहे का? असा प्रश्न आहे. मोहम्मद कैफ हा आयपीएलमध्ये (IPL) दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) टीमचा सहाय्यक प्रशिक्षक आहे. दिल्लीच्या टीममध्ये ऋषभ पंत (Rishabh Pant), श्रेयस अय्यर (Shreyas Iyer), शिखर धवन (Shikhar Dhawan), पृथ्वी शॉ (Prithvi Shaw), अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane), आर.अश्विन (R Ashwin), इशांत शर्मा (Ishant Sharma) आणि अक्षर पटेल (Axar Patel) या टीम इंडियातल्या 8 महत्त्वाच्या खेळाडूंचा समावेश आहे. महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या खेळाडूंवर कायमच टीममधून बाहेर ठेवण्याची टांगती तलवार कायमच असते. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर ऋषभ पंत याचं टीममधलं स्थान पक्कं झालं. तर अजिंक्य रहाणे, इशांत शर्मा आणि आर.अश्विन यांना टेस्ट वगळता वनडे आणि टी-20 मध्ये संधी मिळत नाही. तर शिखर धवन फक्त वनडेमध्ये खेळत असून टी-20 टीममध्ये त्याची निवड होते, पण अंतिम 11 मध्ये त्याला संधी मिळत नाही. टेस्ट क्रिकेटमध्येही तो बराच काळापासून टीमबाहेर आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या पहिल्या टेस्टमध्ये खराब कामगिरी केल्यानंतर पृथ्वी शॉ यालाही टीमबाहेर करण्यात आलं. तर श्रेयस अय्यर दुखापतीमुळे टीमसोबत नसला तरी त्याचं टीममधलं स्थानही सुरक्षित नाही. अक्षर पटेल यालाही रविंद्र जडेजाला दुखापत झाल्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये खेळण्याची संधी मिळाली. दिल्ली कॅपिटल्सच्या टीममधले हे 8 खेळाडू टीम इंडियाच्या कोअर ग्रुपमधले म्हणजेच महत्त्वाचे आहेत. याच टीमचा सहाय्यक प्रशिक्षक असलेल्या मोहम्मद कैफने खेळाडूंना असुरक्षित वाटत असल्याचा दावा केला आहे. आयपीएलमध्ये कैफ या खेळाडूंसोबतच काम करतो, त्यामुळे कैफने या खेळाडूंचीच भावना तर व्यक्त केली नाही ना? असा प्रश्न निर्माण व्हायला जागा आहे. या मुलाखतीमध्ये मोहम्मद कैफने विराटच्या नेतृत्वावरही भाष्य केलं. खेर एक कॅप्टन म्हणून त्यानं किती ट्रॉफी जिंकल्या हे पाहिलं जाईल. तो कॅप्टन म्हणून आजवर एकही आयसीसी ट्रॉफी जिंकू शकलेला नाही,' असं कैफ म्हणाला.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या