Home /News /news /

कोरोनाचा उद्रेक झाल्याने या राज्याने पुन्हा घेतला शाळा बंद करण्याचा निर्णय

कोरोनाचा उद्रेक झाल्याने या राज्याने पुन्हा घेतला शाळा बंद करण्याचा निर्णय

सोशल डिस्टन्सिंगचं पालन व्हावं, यासाठी एका बेंचवर एकच विद्यार्थी असावा, असं सांगण्यात आलं आहे.

सोशल डिस्टन्सिंगचं पालन व्हावं, यासाठी एका बेंचवर एकच विद्यार्थी असावा, असं सांगण्यात आलं आहे.

आत्तापर्यंत 333 मुलांना कोरोनाची लागण झाली असून 38 शिक्षकही बाधित झाले आहेत. त्यामुळे सरकारने तातडीने निर्णय घेत शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलाय.

    नवी दिल्ली 20 नोव्हेंबर: हरियाणात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे. त्यामुळे सरकारने (Haryana government ) शाळा ( schools) पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आता 30 नोव्हेंबर पर्यंत शाळा बंद राहतील. कोरोना रुग्णांची संख्या थोडी कमी झाल्याने 2 नोव्हेंबरपासून हरियाणा सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. 9 ते 12 या वर्गातली मुलं शाळेत येत होती. मात्र 15 दिवसांमध्येच मुलं आणि शिक्षकांमध्ये इन्फेक्शनचं प्रमाण वाढल्याचं (rise in covid 19 cases) दिसून आलं. आत्तापर्यंत 333 मुलांना कोरोनाची लागण झाली असून 38 शिक्षकही बाधित झाले आहेत. त्यामुळे सरकारने तातडीने निर्णय घेत शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलाय. आता सगळ्या शाळां सॅनिटाइज करण्यात येत आहेत. पालकांच्या परवानगीनंतरच मुलांना शाळेत प्रवेश देण्यात आला होता. कोविड सुरक्षेच्या सर्व नियमांचं पाल करावं असं आवाहनही सरकारने केलं होतं. मात्र धोका टाळण्यासाठी सरकारने शाळा पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हरियाणात दोन महिन्यानंतर पुन्हा एकदा उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या ही 20 हजारांवर गेली आहे. दरम्यान महाराष्ट्रातली सरकारने शाळा सुरु करण्याबाबत स्पष्ट भूमिका घेतलेली नाही.  दिवाळीनंतर (Diwali) कोरोनाचा (Coronavirus) पुन्हा उद्रेक झाल्याने मुंबई महानगरपालिकेनं (Mumbai municipal Corporation) मोठा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून (23 नोव्हेंबर) मुंबई महापालिका क्षेत्रातील एकही शाळा (Mumbai School) सुरू होणार नाही. 31 डिसेंबरपर्यंत मुंबईतील सर्व सरकारी, खासगी शाळा बंदच राहातील, अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी 'News18 लोकमत'शी माहिती दिली आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत असताना 23 नोव्हेंबर शाळा सुरु करण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता. काय म्हणाले शिक्षणमंत्री? दुसरीकडे, राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. येत्या सोमवारपासून राज्यात शाळा सुरू करत आहे. पण शाळा सुरू करणे बंधनकारक नाही. राज्यातील विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून सांगणार स्थानिक पातळी परिस्थतीत कोरोनाची काय आहे हे ठरवून निर्णय घ्यावा. पालकांची संमती गरजेची असून विद्यार्थी शाळेत आलेच पाहिजे, असं बंधन नसणार आहे. शाळा जरी सुरू झाल्या तरी ऑनलाईन शिक्षण बंद नसेल त्यामुळे विद्यार्थ्यांच नुकसान होणार नाही. शाळेत विद्यार्थी आले नाही तरी त्यांना अॅटेन्डेन्स मार्क्स यावर परिणाम नाही, असंही शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Coronavirus, School

    पुढील बातम्या