हरयाणा, 18 ऑक्टोबर : डेरा सच्चा सौदाचा (Gurmeet Ram Rahim, head of Dera Sacha Sauda) प्रमुख गुरमीत राम रहीम (Gurmeet Ram Rahim) याला हत्या प्रकरणात सीबीआयच्या (CBI Special Court) विशेष न्यायालयाने सोमवारी आजीवन कारावासाची शिक्षा (Life imprisonment) सुनावली. याशिवाय अन्य चार जणांनाही आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आहे. राम रहीम व अन्य जणांना 2002 मध्ये माजी डेरा प्रबंधक रंजीत सिंह याच्या हत्या प्रकरणात 8 ऑक्टोबर दोषी ठरवलं होतं. शिक्षाची सुनावणी करण्यापूर्वी हरयाणातील पंचकूला जिल्ह्यात सुरक्षा व्यवस्था कडक करीत 144 कलम लागू करण्यात आलं आहे. (haryana 5 convicts including Gurmeet Ram Rahim sentenced to life imprisonment Conviction in a murder case)
ऑगस्ट 2017 मध्ये झालेली हिंसा पाहता राम रहीमशी संबंधित कोणत्याही प्रकरणात सुनावणी पूर्वी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली. 2017 मध्ये बलात्कारच्या एका प्रकरणात राम रहीमला दोषी ठरवल्यानंतर 36 लोक मारले गेले होते. गेल्या सुनावणीदरम्यान सीबीआयने कोर्टाने डेरा प्रमुखासाठी मृत्यूची शिक्षेची मागणी करण्यात आली होती. राम रहीम जेलमध्ये दोन अनुयायींसह बलात्कार करण्यासाठी 20 वर्षांची शिक्षा भोगत आहे. राम रहीमने कोर्टासमोर दयाची विनंती केली होती. याशिवाय ब्लड प्रेशर, डोळे आणि इतर आजारांचं कारणही दिलं होतं.
सीबीआयने डेरा प्रमुखाच्या याचिकेचा विरोध करीत म्हटलं होतं की, पीडिताने त्याला देवासारखं मानलं आणि आरोपीने त्याच्याविरोधात गुन्हा केला. एजन्सीने सांगितलं की, त्याचा गुन्हेगारीचा इतिहास राहिला आहे. अशात एजन्सीने सांगितलं की, राम रहीमच्या विरोधात आयपीसी कलम 302 अंतर्गत अधिकतर शिक्षेची मागणी केली होती.
हे ही वाचा-'मी आमदार आहे..', भर बैठकीत रवी राणा आणि यशोमती ठाकूर यांच्यात खडाजंगी, VIDEO
जुलै 2002 मध्ये रंजीतची हत्या
रंजीत सिंह याचा 2002 मध्ये 10 जुलै रोजी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास सीबीआयच्या विशेष कोर्टाने केला. घटनेच्या 19 वर्षांनंतर या महिन्याच्या सुरुवातीला राम रहीमसह पाच लोकांना दोषी ठरवण्यात आलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.