आ. हर्षवर्धन जाधव यांच्या गौप्यस्फोटाने भाजपातला सत्तासंघर्ष पुन्हा चव्हाट्यावर !

भाजपकडून सेनेच्या आमदारांना फोडण्यासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मला 5 कोटींची ऑफर दिली होती, असा खळबळजनक आरोप आ. हर्षवर्धन पवार यांनी केलाय. हर्षवर्धन जाधव हे औरंगाबादमधील कन्नड मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार आहेत. विशेष म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे ते जावई आहेत.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Nov 15, 2017 04:04 PM IST

आ. हर्षवर्धन जाधव यांच्या गौप्यस्फोटाने भाजपातला सत्तासंघर्ष पुन्हा चव्हाट्यावर !

15 नोव्हेंबर, औरंगाबाद : भाजपकडून सेनेच्या आमदारांना फोडण्यासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मला 5 कोटींची ऑफर दिली होती, असा खळबळजनक आरोप आ. हर्षवर्धन पवार यांनी केलाय. हर्षवर्धन जाधव हे औरंगाबादमधील कन्नड मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार आहेत. विशेष म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे ते जावई आहेत. पण आमच्या नात्याचा या आरोपाचा कुठलाच संबंध लावला जाऊ नये, असंही हर्षवर्धन जाधव यांनी म्हटलंय. विशेष म्हणजे या विषयावरून अजूनपर्यंत चंद्रकांत पाटील किंवा प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही त्यामुळे या आरोपाच्या निमित्ताने भाजपातला सत्तासंघर्षही पुन्हा चव्हाट्यावर आल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातंय.

गेल्या महिन्यात माझ्या कन्नड मतदारसंघातील रस्त्यांची कामं घेऊन मी चंद्रकांत पाटलांकडे गेलो असता, चर्चेदरम्यान त्यांनी माझ्यासह 25 आमदारांना भाजप प्रवेशासाठी ही प्रत्येकी 5 कोटींची ऑफर दिली होती. एवढंच नाहीतर पोटनिवडणुकीत पडलात तर विधान परिषदेवर पाठवू, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले होते. असंही हर्षवर्धन जाधव म्हणालेत.

आ. हर्षवर्धन जाधव म्हणाले, ''महाराष्ट्र सरकारमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये सुरु असलेल्या कुरबुरींमुळे भाजप त्रस्त आहे, असं मला चंद्रकांतदादा म्हणाले. त्यामुळे शिवसेनेचे काही आमदार गळाला लागतात का, यासाठी प्रत्येक आमदाराला पाच कोटींची ऑफर देऊन, त्यांना पोटनिवडणुकीत निवडून आणून, त्यांना भाजपमध्ये घ्यायचं आणि शिवसेनेला बाजूला सारायचं, असा आमचा प्रयत्न असल्याचं चंद्रकांतदादांनी मला सांगितलं. तिच ऑफर त्यांनी मलाही दिली होती. तुमच्याकडे काही कामं असतील, कोणाच्या बदल्या करायच्या असतील, तर सगळं मला सांगा आणि तुम्ही राजीनामा द्या. तुम्ही बायइलेक्शन लढा आम्ही तुम्हाला निवडून आणू, पैसे खर्च करु निवडणुकीमध्ये, अशा पद्धतीने मग तुम्ही आमच्यामध्ये सामील व्हा. अशा पद्धतीने शिवसेनेचे इतर आमदारही सहभागी झाले तर शिवसेनेच्या दररोज होणाऱ्या त्रासातून आम्ही मुक्त होऊ, असं त्यांचं म्हणणं होतं.

दरम्यान, भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी मात्र, आमदार हर्षवर्धन जाधव यांचे आरोप फेटाळून लावलेत. आपला नाकर्तेपणा झाकण्यासाठीच ते अशापद्धतीचा आरोप करत असल्याचं भांडारींनी म्हटलंय, दरम्यान, आ. जाधव भाजप प्रदेशाध्यक्ष दानवे यांचा या आरोपाशी कसलाही संबंध नसल्याचं सांगत असले तरी दानवेनीच चंद्रकांत पाटलांना पक्षांतर्गंत शह देण्यासाठी आपल्या जावयाला पुढे केल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातंय कारण शिवसेनेचे 25 आमदार फोडण्याची चंद्रकात पाटलांची खेळी यशस्वी झाली असती तर दिल्ली दरबारी त्यांचं राजकीय निश्चित वाढलं असतं आणि कदाचित त्याच बळावर राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकू शकले असते. पण त्यांची ही खेळी वेळीच हाणून पाडण्यासाठीच प्रदेशाध्यक्ष दानवेंनी जावयाकरवी आरोपास्त्र सोडलेले दिसतेय. असे एका ज्येष्ठ भाजपनेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 15, 2017 04:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...