माजी मंत्री हर्षवर्धन पाटील अडचणीत

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील अडचणीत

इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी येथील एका शेतजमीनीच्या व्यवहारात दहा जणांनी फसवणूक केल्याच्या दावा इंदापूर न्यायालयात दाखल केला होता. त्याच दाव्याच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने हर्षवर्धन पाटील यांच्यासह आठ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिले आहेत.

  • Share this:

इंदापूर, 24 जुलै : काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या मुलीवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश इंदापूर न्यायालयानं दिला आहे. जमीन व्यवहारात फसवणूक केल्याच्या आरोपावरुन हर्षवर्धन पाटील यांच्यासह आठ जणांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. शेख यांनी दिले आहेत. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्यासमोरच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी येथील एका शेतजमीनीच्या व्यवहारात दहा जणांनी फसवणूक केल्याच्या दावा इंदापूर न्यायालयात दाखल केला होता. त्याच दाव्याच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने हर्षवर्धन पाटील यांच्यासह आठ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिले आहेत.

मांजरा कारखान्याचे कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे यांनी यासंदर्भात इंदापूरच्या न्यायालयात मागील वर्षी दावा दाखल केला होता. कौटुंबिक वादातून जमिनीच्या तडजोडीचा हुकूमनामा झाल्यानंतर आपल्या वाट्याची जमीन फसवून विकण्यात आली, अशी तक्रार रणवरे यांनी पोलिसांकडे दिली होती. मात्र इंदापूर पोलिसांनी तिची दखल न घेतल्याने त्यांनी न्यायालयात फौजदारी दावा दाखल केला होता. त्यावरून न्यायालयाने हर्षवर्धन पाटील यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिलेत. तक्रारदार जितेंद्र रणवरे हे मांजरा सहकारी साखर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 24, 2017 08:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...