उद्धव ठाकरेंवरील आक्षेपार्ह टीका भोवली, हर्षवर्धन जाधव यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

उद्धव ठाकरेंवरील आक्षेपार्ह टीका भोवली, हर्षवर्धन जाधव यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

हर्षवर्धन जाधव यांनी वारंवार उद्धव ठाकरे यांच्यावर प्रचार सभेत आक्षेपार्ह टीका केली. याबद्दल शिवसैनिकांमध्ये आधीच राग होता.

  • Share this:

औरंगाबद, 18 ऑक्टोबर : आचारसंहितेचा भंग केल्या प्रकरणी कन्नड अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षवर्धन जाधव यांनी भर सभेत उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह टीका केली होती. त्यावरून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. आचारसंहिता पथक प्रमुखच्या तक्रारीवरून पिशोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हर्षवर्धन जाधव यांनी वारंवार उद्धव ठाकरे यांच्यावर प्रचार सभेत आक्षेपार्ह टीका केली. याबद्दल शिवसैनिकांमध्ये आधीच राग होता. दरम्यान, 16 ऑक्टोबरला हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर हल्ला करण्यात आला. काही अज्ञाताकडून त्यांच्या घरावर हल्ला करण्यात आला. समर्थनगर भागातील घरावर रात्री 1 च्या सुमारास हल्ला झाला. तर हा चार अज्ञात इसमांनी हल्ला केला आहे. शिवसैनिकांनी हल्ला केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला आहे.

4 अज्ञात रात्रीच्या वेळी घराबाहेर आले आणि त्यांनी घरावर आणि गाड्यांवर दगडफेक केली. यामध्ये त्यांच्या गाड्यांचं नुकसान झालं आहे. दरम्यान, हल्ला झाला तेव्हा हर्षवर्धन जाधव हे घरी नसून प्रचारासाठी कन्नडला होते. त्यामुळे हर्षवर्धन जाधव हे घरात नसताना कोणी हल्ला केला याबद्दल आता पोलीस तपास करत आहेत.

दरम्यान, हल्लेखोरांनी घराबाहेर दगडफेक करताना जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा देत असल्याची माहिती हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नी (रावसाहेब दानवे यांच्या जेष्ठ कन्या)रंजना जाधव यांनी दिली. तर माझे पती जे काही बोलले ते स्टेजवर जनतेसमोर बोलले आहेत. त्यामुळे तुमच्यात हिम्मत असेल तर समोर येऊन काय करायचं आहे ते करा अशी प्रतिक्रिया रंजना जाधव यांनी दिली होती.

लढत विधानसभेची : कन्नडमधून हर्षवर्धन जाधव पुन्हा आमदार होणार?

शिवस्वराज्य पक्षाचे नेते हर्षवर्धन जाधव यांनी औरंगाबादमध्ये लोकसभेची निवडणूक लढवली. शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे आणि हर्षवर्धन जाधव यांच्यातल्या लढतीमुळे इथली निवडणूक चुरशीची झाली. आता पुन्हा एकदा हर्षवर्धन जाधव आमदारकीला उभे राहिले तर इथे नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

हर्षवर्धन जाधव हे गेल्या 10 वर्षांपासून कन्नड मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत. ते आधी मनसेमध्ये होते, नंतर शिवसेनेतर्फे आमदार झाले. मग त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आमदारकीचा राजीनामा दिला आणि शिवस्वराज्य पक्ष हा स्वत:चा वेगळा पक्ष काढला.

कनन्ड मतदारसंघात मराठा आणि ओबीसी समाजाची संख्या लक्षणीय आहे. बंजारा माळी, मुस्लीम आणि इतर जातीधर्माच्या लोकांचंही या मतदारसंघात प्राबल्य आहे.

हर्षवर्धन जाधव हे यावेळी स्वतःच्या पक्षातून निवडणूक लढवणार आहेत. पण यावेळी मात्र इथे चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

2009 मध्ये हर्षवर्धन जाधव यांना 46 हजार 106 मतं मिळाली. 2014 मध्ये त्यांना 62 हजार 542 मतं मिळाली. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे उदयसिंग राजपूत यांना 2009 साली 41 हजार 999 मतं मिळाली. 2014 साली त्यांना 60 हजार 981 मतं पडली.

उदयसिंह राजपूत यांना 2014 मध्ये निसटचा पराभव स्वीकारावा लागला. आता हेच उदयसिंह राजपूत शिवसेनेत आहेत. त्यांना यावेळी शिवसेनेने तिकीट दिलं तर हर्षवर्धन जाधव विरुद्ध शिवसेना अशी लढत इथे होईल. पण शिवसेनेतून केतन काजे, मारोती राठोड हे नेतेही उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत. शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे हेसुद्धा या मतदारसंघात प्रचारासाठी उतरतील.

आघाडीच्या जागावाटपात कनन्ड मतदारसंघ कुणाकडे जातो हे पाहावं लागेल पण काँग्रेसमधून नामदेव पवार, नितीन पाटील, संतोष कोल्हे असे नेते इच्छुक आहेत. वंचित बहुजन आघाडीही या मतदारसंघात उमेदवार उतरवेल, अशी शक्यता आहे. या सगळ्या चढाओढीत हर्षवर्धन पाटील पुन्हा एकदा इथून आमदार होणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

2014 विधानसभा निवडणुकीतलं मतदान

हर्षवर्धन जाधव - 62 हजार 542 मतं

उदयसिंग राजपूत, राष्ट्रवादी काँग्रेस - 60 हजार 981 मतं

Published by: Renuka Dhaybar
First published: October 18, 2019, 10:47 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading