चंदीगड, 13 डिसेंबर : भाजपचे मंत्री आणि हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज यांनी कोरोना लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर अंबाला इथल्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची पुन्हा दुसरी चाचणी करण्यात आली. ही दुसरी चाचणी देखील पॉझिटिव्ह आली आहे. अनिल विज यांना आता रोहतक इथल्या पीजीआय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल विज यांच्या फुफ्फुसांमध्ये कोरोनाचा संसर्ग आहे. हा संसर्ग अद्याप पूर्णपणे बरा झाला नसावा त्यामुळे दुसऱ्यांदा त्यांची चाचणी केल्यानंतरही कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांची टीम लक्ष ठेवून आहे. विज यांचा दुसरा कोरोना रिपोर्टही आज पॉझिटिव्ह आला. सीटी लेबलमध्ये बरेच सुधार झाले आहेत जे 14 वरून 21 पर्यंत वाढले आहेत. विशेष म्हणजे, गृह आणि आरोग्यमंत्री अनिल विज कोरोना यांना एका आठवड्यापूर्वी संसर्ग झालेला होता.
हे वाचा-कोरोनाव्हायरबाबत नवी माहिती समोर; 5 Genes च्या लोकांना बनवतोय शिकार
आठवड्याभराचा उपचारानंतरही कोरोनाचा संसर्ग काही अंशी शरीरात राहिल्याचा डॉक्टरांचा अंदाज आहे. रात्री उशिरा 8 नंतर अनिल विज यांना उपचारासाठी अंबाला इथून रोहतकला हलवण्यात आलं आहे. तिथल्या रुग्णालयात त्यांच्यावर कोरोनासाठी उपचार सुरू आहेत.
अनिल विज यांनी कोरोना लशीच्या चाचणीदरम्यान लशीचा एक डोस घेतला होता. त्यानंतर कोरोनाची लागण झाल्यानं खऴबळ उडाली होती. मात्र कोरोना लस तयार करणाऱ्या कंपनीने याबाबत सविस्तर निवेदन काढलं असून कोरोना लशीचे 14 दिवसांच्या अंतरानं दोन डोस घेणं आवश्यक होतं. तर एक डोस घेतल्यानंतर त्यांना कोरोना झाल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.