Home /News /news /

आज BJP मध्ये मेगा प्रवेश, काँग्रेसला रामराम केलेले हार्दिक पटेलांचा 15 हजार कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश

आज BJP मध्ये मेगा प्रवेश, काँग्रेसला रामराम केलेले हार्दिक पटेलांचा 15 हजार कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश

Hardik Patel will join BJP today: हार्दिक पटेल (Hardik Patel) हा गुजरातच्या राजकारणातील (Gujarat politics) उगवता तारा आहे.

    गुजरात, 02 जून: हार्दिक पटेल (Hardik Patel) हा गुजरातच्या राजकारणातील (Gujarat politics) उगवता तारा आहे. गुजरातमधील पाटीदार आंदोलनात सामील होण्यापासून ते काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापर्यंत, त्यानंतर प्रदेशाध्यक्ष (state president) झाल्यापासून काँग्रेसला अलविदा केल्यापर्यंत,आता भाजप पक्षात प्रवेश करण्यापर्यंत ते सतत चर्चेत आहेत. सध्या हार्दिक पटेल आपल्या 15 हजार कार्यकर्त्यांसह आज दुपारी 12 वाजता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. पाटीदार नेता हार्दिक पटेलनेही भाजपमध्ये प्रवेश करण्याचे पोस्टर जारी केले आहे. त्यानुसार हार्दिक पटेल गुरुवारी, 2 जून रोजी पटेल कमलम गांधीनगरमध्ये भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात आले. पोस्टरमध्ये म्हटले आहे की, हार्दिकचा भाजपमध्ये प्रवेश करण्याचा कार्यक्रम आज सकाळी 9 वाजल्यापासून सुरू होणार आहे. सकाळी 9 वाजता ते घरी दुर्गा पठण करतील, त्यानंतर ते सकाळी 10 वाजता SGVP गुरुकुल येथे श्याम आणि धनश्याम आरती करतील. 18 मे रोजी काँग्रेसला केला रामराम पोस्टरनुसार, भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी हार्दिक पटेल संतांसह गाय पूजेत सहभागी होणार आहे. त्यानंतर सकाळी 11 वाजता पटेल कमलम गांधीनगर येथे भाजप प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत ते भाजपमध्ये प्रवेश करतील. सध्या अनेक दिवसांपासून काँग्रेसवर नाराज असलेल्या हार्दिक पटेलने 18 मे 2022 रोजी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. काँग्रेसच्या नेतृत्वाचा होत होता त्रास पीएम मोदींना यमराजपासून आणि खोटारडे हे शब्द वापरल्यानंतर प्रसिद्धीस आलेला हार्दिक पटेल आता स्वतः भाजपमध्ये जाणार आहे. 2019 मध्ये हार्दिकने काँग्रेसचा हात धरला होता. 11 जुलै 2020 रोजी काँग्रेसने गुजरातमधील प्रदेश कार्याध्यक्षपदाची कमान हार्दिककडे सोपवली. काँग्रेस नेतृत्वाला त्रास होत होता, त्यामुळेच त्यांनी काँग्रेसमधून माघार घेतल्याचे हार्दिकचे म्हणणे आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: BJP, Gujrat

    पुढील बातम्या